३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:19 PM2022-04-07T16:19:33+5:302022-04-07T16:19:58+5:30

France : २०१८ मध्ये नॉर्थ फ्रान्सची राहणारी सोनिया नावाच्या महिलेने कोणतीही मेडिकलची डिग्री न घेताच लोकांना फसवण्याचा सिलसिला सुरू केला.

Woman impersonated for being doctor for 3 years without any medical training | ३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई

३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई

Next

(France : भारतातील फेक डॉक्टरांचे किस्से तर तुम्ही अनेक ऐकले असतील. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, परदेशातही लोक असेच फेक डॉक्टर बनून लोकांना चूना लावतात आणि लाखो रूपयांची कमाई करतात. फ्रान्सची राहणारी एका महिला सोनियाने असाच फ्रॉड करत ३ वर्ष कितीतरी रूग्णांवर फेक डॉक्टर बनून उपचार केले.

२०१८ मध्ये नॉर्थ फ्रान्सची राहणारी सोनिया नावाच्या महिलेने कोणतीही मेडिकलची डिग्री न घेताच लोकांना फसवण्याचा सिलसिला सुरू केला. सोनियाने रिअल इस्टेट मॅनेजमेंटमधून ग्रॅज्युएशन केलं होतं. पण तिने तिचं फिल्ड बदलून कोणतीही डिग्री न घेता डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक खोटी कागदपत्रेही तिने तयार केली.

सोनियाने आपल्या डॉक्टर बनण्याचा प्लान यशस्वी करण्यासाठी Faculty of Strasbourg मधून डिप्लोमाची खोटी डिग्रीही बनवली आणि Order of Physicians चंही खोटं सर्टिफिकेट तयार केलं. याच्या आधारावर तिला नोकरी मिळाली आणि तिने ३ वर्षापर्यंत कोणत्याही अडचणींशिवाय रूग्णांचं चेकअप केलं आणि त्यांच्यावर उपचारही केले. ऑक्टोबर २०२१ पर्यंत महिलेचा नकली डॉक्टर बनण्याचा प्लान यशस्वीपणे सुरू होता. तिने जनरल फिजिशिअन म्हणून साधारण ५८ लाख रूपयांची कमाई सुद्धा केली. यादरम्यान तिच्यावर कुणाला संशयही आला नाही.

नकली फिजिशिअन बनून जेव्हा तिचं मन भरलं तेव्हा महिला डोळ्यांची डॉक्टर होण्याचा प्लान करत होती. पण तिचा भांडाफोड झाला. चौकशीतून समोर आलं की, महिलेने तिच्या पायात टॅगिंग ब्रेसलेटही घातलं होतं. जे गुन्हेगार ट्रॅकिंगसाठी घालतात. फ्रान्स लाइव्हच्या रिपोर्टनुसार, सोनियावर विश्वासघाताचा आरोप लागला आहे.

सोनियाने साडे तीन वर्ष डॉक्टर बनून कोरोनाच्या २० लसीही घेतल्या आणि लोकांना अशी औषधेही दिली ज्यांबाबत तिला काही माहीत नव्हतं. ३ मुलांची आई असलेल्या सोनियाला ३ वर्षासाठी तुरूंगात पाठवला गेलं आहे. ती म्हणाली की, तिने हे सगळं पैशांच्या गरजेपोटी केलं.
 

Web Title: Woman impersonated for being doctor for 3 years without any medical training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.