एकाच महिन्यात २ वेळा प्रेग्नेंट झाली महिला, जुळ्या बाळांना दिला जन्म; डॉक्टरही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:21 PM2022-05-31T17:21:55+5:302022-05-31T17:23:09+5:30
Pregnancy: टेक्सासची राहणारी ३० वर्षीय कॅरा विनहोल्डने नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला. पण या दोन्ही बाळांचा कंसीव होण्याचा वेळ वेगवेगळा होता.
Pregnancy: जगभरातून सहजासहजी विश्वास न बसणाऱ्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही क्वचितच ऐकलं असेल की, एक महिला आधीच प्रेग्नेंट असूनही पुन्हा प्रेग्नेंट झाली. होय...हे सत्य आहे. टेक्सासची राहणारी ३० वर्षी कॅरा विनहोल्डने नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला. पण या दोन्ही बाळांचा कंसीव होण्याचा वेळ वेगवेगळा होता.
कॅरासोबत झालेल्या या घटनेची चर्चा जगभरात होत आहे. कॅराचं याआधी तीनदा मिसकॅरेज झालं आहे. ज्यातील एकावेळी तर तिच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. पण नंतर कॅरासोबत असं काही झालं ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल. आधीच प्रेग्नेंट झाल्यावर ती पुन्हा एकदा प्रेग्नेंट झाली.
हेल्थलाइननुसार, या कंडिशनला सुपरफेटेशन असं म्हणतात ज्यात आधीच प्रेग्नेंट असलेली महिला या पुन्हा कंसीव करते. कॅराने डॉक्टरांना विचारलं की हे कसं झालं आणि दुसरं बाळ अचानक कसं आलं? यावर डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तू २ वेळ ओव्यूलेट केलं म्हणजे तिचे एग्स एकाचवेळी रिलीज झाले होते, पण ते फर्टिलाइज होण्याचा वेळ एक आठवड्यानंतरचा होता.
कॅरा गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेंट झाली होती. ज्यानंतर लगेच दुसऱ्याच महिन्यात ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली. आता तिने तिच्या दोन्ही बाळांना ६ मिनिटांच्या अंतराने जन्म दिला.
कॅरा म्हणाली की, हा तिच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार आहे. कॅरा आणि तिच्या पतीने २०१८ मध्ये पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी ट्राय करणं सुरू केलं होतं. पण २०१९ आणि २०२० मध्ये दोनदा तिचं मिसकॅरेज झालं. तिसऱ्यांदा मिसकॅरेज झालं तेव्हा तिचा जीव थोडक्यात वाचला. पण त्यानंतर जे झालं त्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. ती बाळांच्या जन्माने खूप आनंदी आणि उत्साही आहे.