'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:36 PM2021-04-06T19:36:00+5:302021-04-06T19:46:43+5:30
बदला घेण्यासाठी या तरूणीनं इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यास्मीननं ज्या माणसासह शारीरिक संबंध ठेवले त्याचे माणसाचे फोटो शेअर केले आहेत.
(Image Credit- Getty Images)
फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाबाबत लोक फारसे गांभीर्यानं विचार करत नसले तरी एखादी छोटीशी चूकही तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. ब्रिटनच्या उत्तर सॉर्कशायरमध्ये यास्मीन वॉकर नावाच्या महिलेनं असाच काहीसा प्रकार केला आहे. बदला घेण्यासाठी या तरूणीनं इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यास्मीननं ज्या माणसासह शारीरिक संबंध ठेवले त्याचे माणसाचे फोटो शेअर केले आहेत.
यॉर्क कोर्टात सुनवाई दरम्यान या महिलेनं सांगितलं होतं की हे फोटो तिनं अशावेळी अपलोड केले जेव्हा तिच्या या मित्रानं मला फक्त मित्र म्हणून राहायचं असं म्हटलं होतं. ३० वर्षांच्या यास्मीननं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका माणसाचे न्यूड फोटो शेअर केले होते. ज्याठिकाणी तिचे जवळपास १३००० फॉलोअर्स होते. माणसाचे न्यूड फोटो शेअर करताना या महिलेनं गमतीदार कॅप्शन्सही दिले होते.
या माणसाच्या म्हणण्यानुसार पीडित व्यक्ती सिनेमा हॉलमध्ये असताना त्याला हे स्क्रीनशॉट्स पाठवण्यात आले. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या मुलीनं धमकीसुद्धा दिली होती. वकीलानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ११ मिनिटांपर्यंत हे फोटो ऑनलाईन टाकण्यात आले होते. या तरूणीनं स्वतःचा बचाव करताना म्हटलं की, सोशल मीडियावर हे फोटो तिनं चुकून पोस्ट केले होते. कारण आधीच्या रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर भांडणादरम्यान तिची दृष्टी कमी झाली होती. यावेळी तिच्या एका डोळ्याला कमी दिसत होतं.
कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना मोठा दिलासा; आता निश्चिंतपणे करता येईल अवयवदान
दृष्टी गेल्यामुळे तिनं चुकून हे पोस्ट केल्याचं म्हटलं. कोर्टानं आता यास्मीनला तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. 'रिवेंज पॉर्नोग्राफी' अंतर्गत या गुन्हासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टानं यास्मीनला सांगितलं की, आपल्या सोशल मीडियावर मोजताही येणार नाहीत एवढ्या लोकांसमोर तू या माणसाचे फोटो टाकून गुन्हा केला आहे. पिडीत तरूणानं स्क्रिनशॉर्ट्स पाहताच या मुलीला डिलीट करण्याची विनंतीही केली होती.