बाबो! 28 वर्षे अन् तब्बल 200 सर्जरी; तरुणी आपलं हृदय, लिव्हर ठेवते कपाटात; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:39 PM2022-10-21T13:39:41+5:302022-10-21T13:40:13+5:30

जेसिका मॅनिंग असं या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती तिचं हृदय आणि लिव्हर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून कपाटात ठेवते.

woman keeps her heart and liver in plastic bag differently born people around the world | बाबो! 28 वर्षे अन् तब्बल 200 सर्जरी; तरुणी आपलं हृदय, लिव्हर ठेवते कपाटात; कारण ऐकून व्हाल हैराण

फोटो - news18 hindi

googlenewsNext

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत असून त्यांच्या समस्या देखील विविध प्रकारच्या असतात. काही मेडिकल कंडीशन अशा असतात ज्या पाहून डॉक्टरी अनेकदा हैराण होतात. अशाच एका अजब कंडीशनसह मुलीचा जन्म झाला असून तिचं हृदय सामान्य स्थितीत नाही. तिच्यावर आतापर्यंत 200 हून अधिक सर्जरी करण्यात आल्या आहेत. जेसिका मॅनिंग असं या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती तिचं हृदय आणि लिव्हर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून कपाटात ठेवते. 

जेसिका मॅनिंगचं आयुष्य सध्या मशीनवर सुरू आहे. ती सध्या हृदयाशी संबंधित आजाराशी लढणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. जेसिका 28 वर्षांची असून ती न्यूझीलंडमध्ये राहते. तिला जन्मतःच हृदयाशी संबंधित आजार आहे. जन्मल्यावर तिचं हृदय अर्धच विकसित झालं होतं. त्यात एक छिद्र आणि लीक करणारे वॉल्व्ज होते. Truly च्या रिपोर्टनुसार, जेसिकाच्या तिसऱ्या वाढदिवसापर्यंत तिच्यावर 2 ओपन हार्ट सर्जरी झाल्या होत्या. यामुळे ती काहीच वर्ष जगू शकेल, असा अंदाज होता. मात्र, आता ती 28 वर्षांची आहे. 

तिच्यावर 200 पेक्षा जास्त सर्जरी झाल्या आहेत. यातील 5 ओपन हार्ट सर्जरी आहेत, 2 पेसमेकरसाठीच्या सर्जरी आणि एक फुफ्फुसांवरील सर्जरी आहे. 25 वर्षांची होईपर्यंत तिच्या हृदय आणि यकृताचं प्रत्यारोपण झालं होतं. आपल्या छातीमध्ये एक मशीन आहे आणि स्वतःच्या हृदयाच्या जागी दुसऱ्याचं हृदय आहे. प्रत्यारोपणाच्या या सर्जरीसाठी जेसिका जवळपास 53 दिवस रुग्णालयात ICU विभागात राहिली. त्यानंतर 14 दिवस वॉर्ड आणि 21 दिवस रिहॅबिलिटेशन राहिल्यावर मग आता ती सर्वसामान्यांसारखं जगू लागली आहे. तिच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे अनेक खुणा आहेत.

सर्जरीनंतर तिचं हृदय आणि यकृत विद्यापीठात संशोधनासाठी पाठवण्यात आलं. 10 महिन्यांनंतर ते अवयव पुन्हा तिला मिळाले, तेव्हा तिनं ते घरात ठेवले. ते अवयव प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी ती कपाटात ठेवते. तिचे हे अवयव टिकटॉक व्हिडिओद्वारे दाखवून ती अवयव प्रत्यारोपणाबाबत जगजागृतीही करते. तिचे हे व्हिडीओ खूप पाहिले जातात. अनेक लोक तिच्या धैर्याबद्दल तिचं कौतुकही करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: woman keeps her heart and liver in plastic bag differently born people around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.