अस्वच्छतेचा कळस! रोज 2 तास जॉगिंगला जायची पण 4 महिन्यांपासून आंघोळच नाही करायची अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:10 PM2022-12-05T15:10:54+5:302022-12-05T15:12:08+5:30
महिलेने तिच्या रुममेटला चार महिन्यांत कधीही आंघोळ करताना पाहिले नव्हते. मात्र, ती रोज जॉगिंगला जायची.
माणूस आणि प्राणी यांच्यात एक फरक म्हणजे माणूस आपल्या स्वच्छतेची नीट काळजी घेतो आणि चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतो, पण प्राणी असं करत नाहीत. जर माणसंही जनावरांसारखी वागली तर त्यांच्यात आणि जनावरांमध्ये काय फरक राहील. पण अनेकांना हे कळत नाही. एका महिलेसोबत असंच काहीस झालं आहे, जेव्हा तिला तिच्या रूममेटबद्दलचे किळसवाणी गोष्ट कळली तेव्हा ती हादरली आणि तिने थेट आपल्या रुममेटला बाहेरचा रस्ता दाखवल्याची घटना घडली आहे.
महिलेने तिच्या रुममेटला चार महिन्यांत कधीही आंघोळ करताना पाहिले नव्हते. मात्र, ती रोज जॉगिंगला जायची. जेव्हा या महिलेची सहनशक्ती संपली तेव्हा तिने मोठा निर्णय घेऊन रुममेटला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच तिने स्वतः Reddit वर ही धक्कादायक घटना लोकांसोबत शेअर केली आहे आणि लोकांना तिने बरोबर केलं की चूक केलं? असा प्रश्नही विचारला आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेने Reddit वर एक पोस्ट टाकली आणि सांगितले की तिच्या एका रुममेटने अस्वच्छतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्या दोघी गेल्या 4 महिन्यांपासून एकत्र राहत होत्या पण ती कधीही आंघोळ करत नव्हती. ती रोज 2 तास जॉगिंगला जायची, परत येऊन आंघोळ करायची नाही. शेवटी परिस्थिती अशी झाली की दुर्गंधीमुळे तिच्या जवळ उभे राहणंही कठीण झालं होतं. तिच्याशी बोलूनही ती आंघोळीचा विषय सतत टाळायची. अखेर तिने ही बाब घरमालकापर्यंत पोहोचवली, त्यांनी रुममेटला महिनाभरात घर सोडण्याची नोटीस दिली.
या महिलेने याबाबत लोकांचे मत विचारले कारण काही लोकांनी तिला सांगितलं की ख्रिसमसच्या आधी अशाप्रकारे कोणाला घरातून बाहेर काढणे योग्य नाही. त्याचवेळी, रेडिटवरील लोकांनी महिलेच्या निर्णयाचे समर्थन केले आणि सांगितले की तिने काहीही चुकीचे केले नाही आणि तिला घरातून काढण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. दुसरीकडे, काही लोकांनी त्यांचा असाच अनुभव सांगितला आणि सांगितले की, त्यांनाही असे लोक भेटले आहेत, जे आंघोळ करत नाहीत किंवा वर्षानुवर्षे बेडशीट बदलत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"