मज्जा-मस्करीत लेकीला कळालं बापाचं २८ वर्षापूर्वीचं गुपित; पायाखालची जमीनच सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:19 PM2022-02-04T14:19:56+5:302022-02-04T14:20:54+5:30
सुरुवातीला जेसिकाला हा रिपोर्ट चुकीचा वाटला त्यानंतर पुन्हा तिने टेस्टिंग केलं.
डीएनए टेस्टिंगचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. डीएनए चाचणीमुळे अनेक गोष्टी उघडकीस येतात. नातेवाईक, रक्ताची नाती हेदेखील समजतात. त्याचसोबत डीएनए चाचणी कुठल्याही जैविक आजाराबद्दल शोध घेऊ शकतो. अनेकजण डीएनए चाचणीसाठी उत्सुक असतात. त्यात अनेक वेबसाईट्स, टेस्टिंग किट उपलब्ध आहेत ज्यामुळे घरबसल्या तुम्ही डीएनए चाचणी करु शकता.
अलीकडेच एका अमेरिकन कुटुंबाने होम टेस्टिंग किटनं डीएनए किटनं चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पाहून सर्वच हैराण झाले. डीएनए चाचणीतून पुढे आलं की, कुटुंबातील मुलीचे बायोलॉजिकल रित्या तिच्या वडिलांशी कुठलेही संबंध नाहीत. हे प्रकरण २०२० मधील क्रिसमसचं आहे. ओहयोमध्ये राहणारी जेसिका हार्वे आणि तिच्या पतीने आई वडिलांना डीएनए टेस्टिंग किट आणण्यास सांगितले. जेसिकाचं कुटुंब इटली जाण्याचा प्लॅन करत होते. जेसिकाचे वडील माइक हार्वे इटलीचे मूळ रहिवासी आहेत.
टुडे पेरेंट्सद्वारे रिपोर्टनुसार, एका पत्रकार परिषदेत जेसिकानं सांगितले की, आम्ही इटलीला जाण्यासाठी डीएनए टेस्टिंग करण्याचा विचार केला कारण त्याठिकाणी आमचे नातेवाईक आणि त्यांच्याशी निगडीत माहिती मिळू शकेल. त्यामुळे आमच्या आई वडिलांनी क्रिसमस भेट म्हणून डीएनए टेस्टिंग गिफ्ट केले. त्यातून जो काही रिजल्ट समोर आला त्याने सर्वकाही एका क्षणात बदललं. आता कदाचितचं आमचं पूर्वीसारखं जीवन होऊ शकेल. डीएनए चाचणीद्वारे जेसिकाला ती वडील माइकची मुलगी नसल्याचं सत्य कळालं.
सुरुवातीला जेसिकाला हा रिपोर्ट चुकीचा वाटला त्यानंतर पुन्हा तिने टेस्टिंग केल्यानंतर उघड झालं की, ती आई जीनिनची मुलगी आहे परंतु तिचे वडील माइक नाहीत. माइक आणि जीनिन यांनी मुलासाठी आयवीएफचा आधार घेतला होता. तेव्हा डॉक्टरांनी माइकच्या ऐवजी अज्ञात व्यक्तीच्या स्पर्मचा वापर केला. त्यासाठी जेसिकाच्या आई वडिलांनी एक्रोन सिटी हॉस्पिटल आययूएफ केंद्राविरोधात तक्रार दाखल केली. ज्याला आता सुम्मा हेल्थ सिस्टम नावानं ओळखलं जातं.
आई जीनिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अनुवांशिकरित्या आमच्या दोघांशी संबंधित असो असं मुल आम्हाला हवं होतं. या घडलेल्या प्रकारासाठी डॉ. निकोलस स्पिरटोस जबाबदार आहेत. डॉ. निकोलसनं आमच्या परवानगीशिवाय माझ्या पतीऐवजी अज्ञात व्यक्तीच्या स्पर्मचा वापर केला. जीनिन यांनी म्हटलं की, आयवीएफद्वारे १९९२ जेसिकाचा जन्म झाला होता. हार्वे कुटुंबात मुली खूप कमी आहेत. त्यामुळे जेसिका झाल्यामुळे आम्ही खूप उत्साहित होतो. परंतु डीएनए चाचणीचा रिपोर्ट समोर आल्यानं जेसिकाला जबर धक्का बसला आहे.