महिलेने 23 कोटी रूपयांची संपत्ती कुत्रा-मांजरीच्या नावाने केली, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 01:50 PM2024-01-26T13:50:50+5:302024-01-26T13:51:27+5:30

या महिलेने या जगातून जाण्याआधीच आपली 23 कोटी रूपयांची संपत्ती मुलांच्या नावाने न करता आपल्या घरातील पाळीव श्वान-मांजरीच्या नावाने केली.

Woman leaves 23 crores assets to beloved pets instead of children | महिलेने 23 कोटी रूपयांची संपत्ती कुत्रा-मांजरीच्या नावाने केली, कारण....

महिलेने 23 कोटी रूपयांची संपत्ती कुत्रा-मांजरीच्या नावाने केली, कारण....

अनेकदा जीवनात असं होतं की, आपण आयुष्याबाबत जसा विचार करतो तसं होत नसतं. बऱ्याच आई-वडिलांना असं वाटत असतं की, त्यांच्या मुलांनी मोठं होऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे. सोबत राहिले नाही तरी किमान त्यांची विचारपूस केली पाहिजे. जर त्यांनी असं केलं नाही तर आई-वडिलांचं मन दुखतं. त्यांना मानसिक त्रासही होतो. काही वृद्ध लोक याला नशीब समजून शांत बसतात तर काही कठोर पावलं उचलतात. 

चीनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेसोबतही असंच झालं. या महिलेने या जगातून जाण्याआधीच आपली 23 कोटी रूपयांची संपत्ती मुलांच्या नावाने न करता आपल्या घरातील पाळीव श्वान-मांजरीच्या नावाने केली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, महिला शांघायची राहणारी होती आणि तिच्या अनेक पाळीव श्वान आणि मांजरी होत्या.

महिलेचं सरनेम लियु होतं. ती एकटीच तिच्या घरात राहत होती. यादरम्यान तिचं मुलं ना तिला भेटायला येत होते ना आजारी असताना तिला संपर्क करत होते. तिने घरात काही श्वान आणि मांजरी पाळल्या होत्या. ती त्यांच्यासोबतच राहत होती. अशात महिलेचं मन बदललं आणि तिने 2.8 मिलियन म्हणजे 23 कोटी 27 लाख 16 हजार रूपयांची संपत्ती आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावावर केली. जेव्हा हे तिच्या मुलांना समजलं तेव्हा ते हैराण झाले.

प्राण्यांच्या डॉक्टरांना बनवलं केअरटेकर

चीनमध्ये थेट प्राण्यांच्या नावावर संपत्ती केली जाऊ शकत नाही. अशात प्राण्यांच्या एका डॉक्टरला तिने केअरटेकर बनवलं होतं. त्याच्यावरच त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी होती. कायद्याच्या जाणकारांचं मत आहे की, याने तिच्या संपत्तीचा दुरूपयोग वेट क्लीनिक करू शकतं. ज्यांनीही ही कहाणी सोशल मीडियावर वाचली ते म्हणाले की, महिला किती दु:खी असेल की, तिने इतकी संपत्ती अशी प्राण्यांच्या नावावर केली.

Web Title: Woman leaves 23 crores assets to beloved pets instead of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.