२ पार्टनरसोबत आनंदात जगतेय महिला; म्हणते, डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी वेळच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:05 PM2023-04-05T13:05:54+5:302023-04-05T13:06:34+5:30

लैरिसाचे इन्स्टावर ४ लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. ती ८ वर्षापूर्वी सिलवाला भेटली होती

Woman living happily with 2 partners; Says, there is no time to go into depression | २ पार्टनरसोबत आनंदात जगतेय महिला; म्हणते, डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी वेळच नाही

२ पार्टनरसोबत आनंदात जगतेय महिला; म्हणते, डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी वेळच नाही

googlenewsNext

एक नवरा आणि २ बायको असं तुम्ही अनेकदा ऐकले असेल परंतु १ बायको तिचे २ नवरे क्वचितच ऐकायला मिळाले असेल. अशाच एका महिलेने तिचा अनुभव शेअर केला आहे. २ पती असल्याने मी डिप्रेशनमधून बाहेर पडली, आता तिसऱ्या पार्टनरचा शोध आहे असं एका महिलेने सोशल मीडियावर जाहीर सांगितले. ही महिला ब्राझीलमधील २७ वर्षीय सोशल मीडिया स्टार लैरी इंग्रिड आहे. तिला लैरिसा नावानेही ओळखले जाते. लैरिसाच्या एका पतीचे वय २५ वर्ष त्याचे नाव इटालो सिलवा आहे तर दुसरा पती १८ वर्षीय जोआओ विक्टर आहे. या मुलीला १ मुलगी आणि १ मुलगा आहे. लैरिसा ही टिकटॉक, इन्स्टाग्रामवर तिच्या लव्ह लाईफबद्दल व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करते. 

लैरिसाचे इन्स्टावर ४ लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. ती ८ वर्षापूर्वी सिलवाला भेटली होती. त्यानंतर सिलवानेच तिला दुसऱ्या पार्टनरसोबत फन करण्यास सांगितले. तेव्हापासून ती पॉलएँड्री रिलेशनशिपमध्ये आहे. पतीच्या सल्ल्यानंतर तिने लहानपणीचा मित्र विक्टरची निवड केली. विक्टरला ती लहानपणापासून ओळखत होती. तो तिच्या घराशेजारीच राहायचा. विक्टरही लैरिसासोबत नात्यात आनंदाने आला. सुरुवातीला तिघांना एकत्र राहण्यास अडचण झाली त्यानंतर हळूहळू सवय झाली. 

लैरिसाने सांगितले की, २ पुरुषांसोबत राहिल्याने माझे मानसिक आरोग्य ठीक राहण्यास खूप फायदा झाला. माझ्याकडे डिप्रेशनमध्ये जाण्याचा वेळ नव्हता. २ पुरुषांचा सहवास असणे खूप चांगले आहे. हे दोघं माझ्यासाठी भांडी घासतात, घराची साफसफाई करतात. लैरिसाचा दुसरा पती विक्टरने म्हटलं पहिले माझ्या कुटुंबाला हे सर्व स्वीकारणे कठीण गेले परंतु जसा वेळ गेला तसे त्यांनी या नात्याचा स्वीकार केला. 

तर लैरिसासोबत तिसरा व्यक्ती आल्यानंतर मला आणि विक्टरला खूप वेगळी भावना येते. आम्ही दोघेही जळतो. त्यानंतर तिघे एकमेकांशी संवाद साधून ते मिटवतो असं सिलवाने सांगितले. परंतु या नात्यात कुठल्याही अन्य महिलेचा शिरता येणार नाही मात्र तिसऱ्या पुरुषाचा पर्याय खुला आहे असं लैरिसाने स्पष्ट मत व्यक्त केले.

Web Title: Woman living happily with 2 partners; Says, there is no time to go into depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.