महिलेच्या जिभेला झाला होता कॅन्सर, डॉक्टरांनी ती कापली अन् तयार केली नवीन जीभ...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:51 PM2019-12-10T12:51:26+5:302019-12-10T12:54:03+5:30
एका ३६ वर्षीय महिलेला जिभेला कॅन्सर झाला होता. अर्थातच त्यामुळे डॉक्टर्सना महिलेचा जीभ कापावी लागली.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
यूकेतील एका ३६ वर्षीय महिलेला जिभेला कॅन्सर झाला होता. अर्थातच त्यामुळे डॉक्टर्सना महिलेचा जीभ कापावी लागली. नंतर डॉक्टरांनी तिला एक नवीन जीभ लावली. ही नवीन जीभ महिलेल्या हाताच्या त्वचेपासून तयार करण्यात आली.
Buckinghamshire मध्ये राहणारी महिला Stephanie Wiggleswort बऱ्याच दिवसांपासून जिभेच्या कॅन्सरने ग्रस्त होती. डॉक्टरांनी तिची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जिभेच्या ज्या भागात कॅन्सर होता, तो कापला.
डॉक्टरांनी महिलेल्या घशापासून सर्जरी सुरू केली. घशातूनच जिभेचा एक भाग कापला. नंतर एक नवीन जीभ तयार केली. त्यासाठी त्यांनी महिलेच्या हाताच्या त्वचेचा वापर केला. या संपूर्ण सर्जरीमध्ये ४ ते ५ तास लागले. ही सर्जरी यशस्वी झाली असली तरी या महिलेचा आवाज आधीसारखा राहिला नाही.
Stephanie ने सांगितले की, ज्या हाताची त्वचा जिभेसाठी घेण्यासाठी घेण्यात आली त्या जागेवर जिभेपेक्षा जास्त वेदना होत आहेत. त्यांनी सांगितले की, 'माझ्या सर्व मित्रांना हे माहीत आहे की, मी एक सकारात्मक विचार करणारी महिला आहे. मला माझा आवाज परत हवा आहे. पण असं होऊ शकत नाही. मला हे माहीत आहे. मी स्मोकिंग करायची. त्यामुळे माझ्यासोबत हे होणारच होतं. मला आता बस माझ्या परिवारासोबत रहायचं आहे'.