अरे बापरे! एका टेस्टमुळे महिलेने गमावले ८० टक्के केस, चेहरा आरशात पाहुन कोसळले रडु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:29 AM2022-03-09T10:29:13+5:302022-03-09T10:29:23+5:30

भयंकर आजारापासून वाचवणाऱ्या या टेस्टही किती भयंकर ठरू शकतात, याचा अनुभव एका महिलेने शेअर केला आहे. एका मेडिकल टेस्टमुळे या महिलेला टक्कल पडलं आहे. तिच्या डोक्यावरील तब्बल ८० टक्के केस गायब झाले आहेत.

woman lost 80 percent hair because of test | अरे बापरे! एका टेस्टमुळे महिलेने गमावले ८० टक्के केस, चेहरा आरशात पाहुन कोसळले रडु

अरे बापरे! एका टेस्टमुळे महिलेने गमावले ८० टक्के केस, चेहरा आरशात पाहुन कोसळले रडु

googlenewsNext

आपल्याला एखादा गंभीर आजार होऊ नये किंवा त्याचं निदान वेळेत होऊन लवकराच लवकर त्याचं निदान व्हावं. यासाठी काही मेडिकल टेस्ट आपण करतो. पण भयंकर आजारापासून वाचवणाऱ्या या टेस्टही किती भयंकर ठरू शकतात, याचा अनुभव एका महिलेने शेअर केला आहे. एका मेडिकल टेस्टमुळे या महिलेला टक्कल पडलं आहे. तिच्या डोक्यावरील तब्बल ८० टक्के केस गायब झाले आहेत (Woman bald after smear test).

आर्यलँडच्या यॉर्कमध्ये राहणारा २७ वर्षांची क्लो शीहान  (Chloe Sheehan) एलोपेशिया एरिटा (alopecia areata) नावाच्या समस्येने ग्रस्त आहे. ही केस गळण्याची समस्या आहेत. ज्यामध्ये डोक्याच्या एका विशिष्ट भागावरील केस गळतात तिथं बाल्ड पॅच तयार होतो. क्लोला याबाबत २०१७ साली समजलं.  हेअरड्रेसरने तिला तिच्या डोक्यात एका भागावर टक्कल पडल्याचं सांगितलं. तेव्हापासून तिला चिंता वाटत होती. आपलं हे टक्कल म्हणजे एका गंभीर आजाराची सुरुवात झाली होती, याची कल्पना मात्र तिला बिलकुल नव्हती. तिच्या केसगळतीचं कारण होतं तिच्या पांढऱ्या रक्तपेशींचा केसांच्या मुळांवर हल्ला, ज्यामुळे तिला टक्कल पडायला सुरुवात झाली.

हा आपण करत असल्याचा स्मीअर टेस्टचा (Smear test) परिणाम आहे, असा दावा तिने केला आहे. सर्व्हाइकल कॅन्सरचं निदान व्हावं यासाठी ही टेस्ट केली जाते. केस गळणं हा या टेस्टचा दुष्परिणाम आहे. या प्रक्रियेमुळे पडणारं टक्कल कायम तसं राहत नाही. थेरेपी थांबल्यानंतर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे केस लवकरच परत येतात.

क्लोचे केससुद्धा आले होते. पण आता ते पुन्हा गळू लागल्याने तिला भीती वाटू लागली. ८० टक्के केस गळल्यानंतर तिने शेवटी विग लावण्याचा निर्णय घेतला. कारण केसांशिवाय ती जेव्हा स्वतःला आरशात पाहायची तेव्हा तिला रडू कोसळायचं. पण हा कायमचा मार्ग नव्हता. कारण आता तर तिचे आयब्रो म्हणजे भुवयांवरील केसही गळू लागले आहेत.

Web Title: woman lost 80 percent hair because of test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.