धक्कादायक! पेनकिलरने हिरावलं कायमचं हसू, 19 व्या वर्षी तरुणीचे तुटले दात; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:37 PM2023-04-20T12:37:01+5:302023-04-20T12:43:43+5:30
पेनकिलर घेतल्यामुळे तिला पाच महिने सतत उलट्या होत होत्या. वयाच्या 19व्या वर्षी तिचे दात गेले.
एका महिलेने केलेला दावा ऐकून सर्वच जण हैराण झाले आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी पेनकिलर घेतल्याने तिने दात गमावल्याचं सांगितलं. कॅनडातील वँकूवर येथील रहिवासी असलेल्या नताली लकासेने सांगितले की, ती वयाच्या बाराव्या वर्षापासून दात दुखापतीचा समस्येचा सामना होती. ती टेम्पोरोमँडिब्युलर डिसऑर्डरने (TMD) ग्रस्त होती. या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नतालीने वयाच्या 18 व्या वर्षापासून पेनकिलर घेणे सुरू केले.
पेनकिलर घेतल्यामुळे तिला पाच महिने सतत उलट्या होत होत्या. वयाच्या 19व्या वर्षी तिचे दात गेले. ती लोकांपासून आपला चेहरा लपवू लागली आणि तिला बाहेर जाण्याची लाज वाटू लागली. मग लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. यामुळे नतालीला अधिक त्रास झाला असता. नताली म्हणाली, "अनेक वर्षांपासून मी स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही असं वाटलं, ज्याचा माझ्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत होता."
जेव्हा जेव्हा डॉक्टर माझे दात पाहायचे आणि त्यांच्या स्थितीबद्दल ऐकायचे तेव्हा ते नेहमी औषधांबद्दल प्रश्न विचारू लागले. मी सांगायची की मी असे काही करत नाही. पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. नतालीने सांगितले की, वयाच्या 18 व्या वर्षी कार अपघातानंतर पाठीच्या खालच्या स्नायूंना दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी वेदना टाळण्यासाठी दुसरी पेनकिलर दिली. हे औषध एक ते दोन आठवडे घेण्यास सांगितले. येथूनच सर्व समस्या सुरू झाल्या. नतालीला दिवसातून अनेक वेळा उलट्या होऊ लागल्या. प्रत्येक उलटीनंतर ती दात घासायची. यानंतर तिचे दात तुटू लागले. तिला नीट हसता यावं म्हणून तिने 4000 पौंड (जवळपास 4 लाख रुपये) खर्च केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"