बॉयफ्रेन्डला उद्ध्वस्त करण्यासाठी गर्लफ्रेन्डकडून रेपची खोटी केस, महिलेला ४ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:03 AM2021-04-22T11:03:46+5:302021-04-22T11:03:59+5:30

२०१४ मध्ये अनीशाला समजलं की, तिचा बॉयफ्रेन्ड इकबाल मोहम्मद हा विवाहित आहे. अनीशाला हे समजल्यावर तिला मोठा धक्का बसला.

A woman made false rape case on boyfriend after she found out that he is married | बॉयफ्रेन्डला उद्ध्वस्त करण्यासाठी गर्लफ्रेन्डकडून रेपची खोटी केस, महिलेला ४ वर्षांची शिक्षा

बॉयफ्रेन्डला उद्ध्वस्त करण्यासाठी गर्लफ्रेन्डकडून रेपची खोटी केस, महिलेला ४ वर्षांची शिक्षा

Next

ब्रिटनमध्ये एका महिलेला जेव्हा समजलं की, तिचा बॉयफ्रेन्ड आधीच विवाहित आहे तर हा धक्का ती सहन करू शकली नाही. त्यानंतर रागाच्या भरात बॉयफ्रेन्ड जीवन खराब करण्यााचा तिने निर्णय घेतला. हाच तिचा निर्णय तिला आता तुरूंगात घेऊन गेला आहे. २०१४ मध्ये अनीशाला समजलं की, तिचा बॉयफ्रेन्ड इकबाल मोहम्मद हा विवाहित आहे. अनीशाला हे समजल्यावर तिला मोठा धक्का बसला.

कारण तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. तिचा बॉयफ्रेन्डवर खूप विश्वास होता. त्यामुळे तिने त्याला शिक्षा देण्याचा निश्चय केला. त्यानंतर अनीशाने इकबालवर रेपचे खोटे आरोप लावणे सुरू केले. इकबाल आणि अनीशाची भेट लिंक्डइनवर झाली होती. अनीशा ऑक्सफोर्डच्या एका लॉ फर्ममध्ये काम करत होती. त्यानंतर दोघे भेटू लागले आणि दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं. कोर्टासमोर सांगण्यात आलं की, कशाप्रकारे अनीशाने सुनियोजितपणे इकबालचं लाइफ खराब करणं सुरू केलं होतं. (हे पण वाचा : ना उम्र की सीमा हो...! पतीला घटस्फोट दिल्यावर ३१ वर्षीय महिलेने चक्क सासऱ्यासोबत थाटला संसार)

अनीशाने काही धमकी देणारे ई-मेल्सही तयार केले होते. तिने या फेक मेलच्या माध्यमातून स्वत:ला धमकी दिली आणि मेल सेंडरमध्ये इकबालचं नाव लिहिलं. अनीशाने हे मेल्स पुरावे असल्याचे सांगत म्हणाली की, तो तिला जीवे मारण्याची धमकी देत होता आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर इकबालला अटक करण्यात आली. (हे पण वाचा : भारताच्या सीमेवरील एक असं गाव ज्याच्या प्रमुखाला आहेत ६० बायका, दोन देशांचं आहे नागरिकत्व!)

इकबाल यादरम्यान म्हणाला होता की, त्याने कोणतेही धमकी देणारे मेल्स केले नाहीत. त्यानंतर त्याने काही आयटी तज्ज्ञांची मदत मागितली ज्यानंतर हे स्पष्ट झालं की, ईमेल्स इकबाल नाही तर अनीशानेच पाठवले होते. नंतर अनीशाला अटक करण्यात आली. तिने मान्य केलं की, मेल्स तिनेच पाठवले होते. पण सोबतच असंही म्हणाली की, इकबाल तिला आताही त्रास देतो.

अनीशा सूडाच्या भावनेत इतकी जळत होती की, ती यानंतरही थांबली नाही. आता अनीशाने इकबालवर रेपचे आरोप लावले. तिने फार डिटेलमध्ये काही गोष्टी सांगितल्या. ती तिच्या किडनॅपिंगचं प्लॅनिंगही करत होती. या सर्वाचा इकबालच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. त्याचं करिअर संपत होतं. फॅमिलीतत समस्या सुरू होत्या.

याप्रकरणी इकबाल म्हणाला होता की, मी शब्दात सांगू शकत नाही की, माझ्यासाठी हा काळ किती भयावह होता. मी काही वर्षांपूर्वी फेटल अट्रॅक्शन हा हॉलिवूड सिनेमा पाहिला होता. पण ता तो सिनेमा मी बघत नाही. कारण त्यात ज्या स्तरावर महिला बदला घेते, तसंच काहीसं माझ्यासोबत होत होतं.

इकबालचे वकिल म्हणाले होते की, अनीशाला रिजेक्शन सहन होत नाही आणि हेच कारण आहे की, तिचं वागणं अधिक भयावह होत जात होतं. ती इमोशनल स्तरावर सामान्य नाहीये. तिच्यात पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. आता कोर्टाने या प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 
 

Web Title: A woman made false rape case on boyfriend after she found out that he is married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.