लेकीला धडा शिकवण्यासाठी आईने तिला केलं किडनॅप! वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:30 PM2022-04-20T18:30:16+5:302022-04-20T18:31:12+5:30

एका आईने आपल्या अशा लेकीला धडा शिकवण्यासाठी असं काही केलं आहे की, ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे (Mother daughter news). तिने आपल्या लेकीला चांगला मार्ग दाखवण्याच्या नादात स्वतः खतरनाक पाऊल उचललं आहे.

woman makes fake profile chat with daughter and kidnap her to teach her lesson | लेकीला धडा शिकवण्यासाठी आईने तिला केलं किडनॅप! वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

लेकीला धडा शिकवण्यासाठी आईने तिला केलं किडनॅप! वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

Next

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना चांगलं-वाईट समजावं यासाठी पालक काय काय नाही करत. कुणी ओरडून, कुणी मारून, तर कुणी प्रेमाने समजवतं. पण जसजशी मुलं मोठी होतात तसतसं मुलांवर यापैकी कोणत्याच गोष्टीचाही परिणाम होत नाही मग  त्यांना समजावणं म्हणजे पालकांसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं. मुलं काहीच आणि कुणाचंच ऐकत नाहीत अशावेळी काय करावं ते पालकांनाही समजत नाही. पण एका आईने आपल्या अशा लेकीला धडा शिकवण्यासाठी असं काही केलं आहे की, ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे (Mother daughter news). तिने आपल्या लेकीला चांगला मार्ग दाखवण्याच्या नादात स्वतः खतरनाक पाऊल उचललं आहे.

मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचं सर्वात धोक्याचं वय म्हणजे किशोरवय. या वयात मुलांमध्ये हार्मोन्स बदलही होत असतात त्यानुसार त्यांचं वागणंही बदलतं. या वयात मुलांना वेळीच सावरलं नाही तर ती भरकटतात. १४ वर्षांच्या मुलीची आई असलेली लॅसी विल्सनलाही आपल्या मुलीची चिंता सतावत होती. तिने आपल्या मुलीला एक धडा शिकवण्याच्या नादात असं पाऊल उचललं ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तिने जे केलं त्यानंतर बहुतेकांनी तिला ट्रोल केलं आहे (Mother making fake profile on social media and kidnapping daughter).

लेसीने मुलाच्या नावाने सोशल मीडियावर आपलं एक फेक प्रोफाईल बनवलं आणि आपल्या मुलीसोबत मैत्री केली. शहरात नवा असल्याचं सांगून तिने तिच्यासोबत चॅटिंग केली. त्यानंतर घराबाहेर भेटायला बोलावून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. लेसीने तिला गार्डनमध्ये भेटायला बोलावलं आणि स्वतः झाडामागे लपली. जशी तिची मुलगी आली तसं तिने तिच्या मागून तिच्यावर हल्ला करून तिला पकडलं.

आपली मुलगी किती सहजरित्या अनोळख्या व्यक्तीच्या जाळ्यात फसली हे तिला दाखवणं हाच तिचा उद्देश होता, असंं तिने सांगितलं. अशा पद्धतीने फसवणूक करून कुणीही तिला किडनॅप करू शकतं. द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने जसा आपला हा किस्सा सोशल मीडियावर लोकांसोबत शेअर केला, तसं त्यावर वेगवेगळ्या कमेंट आल्या. काहींनी या आईची चिंता समजून तिने जे केलं ते योग्य केल्याचं म्हटलं. तर काहींनी लेकीला धडा शिकवण्याच्या नादात आई टॉक्सिक बनल्याचं म्हटलं आहे. आता याकडे कसं पाहणं हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोन. पण आईची ही आयडिया किती यशस्वी ठरली हा सर्वात मोठा प्रश्न.

लॅसीने सांगितलं की तिने उचललं हे पाऊल कामी आलं. तिची मुलगी जी आता 16 वर्षांची झाली आहे, ती तिची सर्वात चांगली मैत्रीण बनलली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती आपल्या आईसोबत शेअर करते. याचा अर्थ तिने दिलेला धडा तिला समजला आहे.

Web Title: woman makes fake profile chat with daughter and kidnap her to teach her lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.