6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 09:08 AM2023-02-28T09:08:43+5:302023-02-28T09:11:19+5:30

Bihar : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही.

Woman married for the third time in 6 months in Begusarai Bihar | 6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न, गावातील लोकांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण...

googlenewsNext

Bihar : सध्या लग्नाच्या वेगवेगळ्या अजब घटना समोर येत आहेत. कुठे नवरी मंडपातून पळून गेली तर कुठे नवरदेवाने वेळेवर लग्नास नकार दिला. मात्र, सध्या एका लग्नाची फारच चर्चा रंगली आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरूणाला गावातील लोकांना पकडलं आणि मंदिरात जबरदस्ती त्यांचं लग्न लावून दिलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या लग्नास नकार देत होते, पण गावातील लोकांनी त्यांचं काही ऐकलं नाही. मंदिरात जबरदस्ती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बरियारपूर पूर्वी गावातील ही घटना आहे. असं सांगितलं जात आहे की, गेल्या सहा महिन्यात तरूणीचं हे तिसरं लग्न आहे. जे परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आरती कुमारी (20) ही बेगूसरायच्या मुबारकपूर गावात राहणारी आहे. तिचं लग्न आधी टांरी गावातील एका तरूणासोबत लावून देण्यात आलं होतं. पण काही कारणामुळे हे लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. त्यामुळे नातेवाईकांना तिचं लग्न गावातीलच नीतीश कुमार नावाच्या तरूणासोबत लावून दिलं. यादरम्यान आरतीचं नीतीशचा मित्र सिंटूसोबत अफेअर सुरू झालं. दोघेही लपून भेटू लागले.

रविवारी रात्री सिंटू आणि आरतीला भेटताना गावातील लोकांनी पाहिलं आणि त्यांना पकडून मंदिरात नेलं. इथे दोघांचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर दोघेही तिथून गेले. दोन्ही परिवार त्यांचा शोध घेत आहेत. पण अजून ते काही सापडले नाहीत. 

Web Title: Woman married for the third time in 6 months in Begusarai Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.