वडिलांपेक्षा 4 वर्षाने मोठा आहे मुलगा, महिलेने प्रेमाच्या नादात केला मोठा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 16:17 IST2023-10-07T16:16:53+5:302023-10-07T16:17:07+5:30
अनेक प्रेमाच्या नादात अशीही लग्ने होतात, ज्यात वयाचं अंतर फार जास्त असतं. अशा अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात.

वडिलांपेक्षा 4 वर्षाने मोठा आहे मुलगा, महिलेने प्रेमाच्या नादात केला मोठा कारनामा
तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, लोक लग्नावेळी याची काळजी घेतात की, नवरी आणि नवरदेवाच्या वयात फार जास्त अंतर असू नये. जेणेकरून ती त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ सोबत घालवू शकतील. पण अनेक प्रेमाच्या नादात अशीही लग्ने होतात, ज्यात वयाचं अंतर फार जास्त असतं. अशा अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात.
मिररच्या रिपोर्टनुसार, एक महिला तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडली. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. पण जेव्हा त्यांनी लग्न केलं तर ते स्कॅम बनलं. या महिलेने अशा तरूणासोबत लग्न केलं जो तिच्यापेक्षा 21 वर्षाने लहान आहे आणि त्याला सावत्र मुलगा त्याच्यापेक्षा चार वर्षाने मोठा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महिला ज्या घरातील सून बनली तिथे सासूही तिच्यापेक्षा कमी वयाची आहे.
वडिलांपेक्षा मोठा मुलगा, आजीपेक्षा आई मोठी
ही कहाणी डियाना बूमर नावाच्या महिलेची आहे. जेव्हा ती 38 वर्षांची होती तेव्हा ती मित्राच्या पुतण्याच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी स्वीटेन नावाच्या मुलाचं वय केवळ 19 वर्षे होतं. एका वर्षात दोघांनी लग्न केलं. आता स्टीवेनचं वय 27 आहे. तर महिलेचं वय 46 आहे. डियाना चार मुलं आहेत, ज्यातील सगळ्यात मोठा मुलगा 31 वर्षांचा आहे. तो त्याच्या सावत्र वडिलांपेक्षा 4 वर्षाने मोठा आहे. या कहाणीतील ट्विस्ट इथेच संपत नाही. स्वत: डियानाही तिच्या सासूपेक्षा काही महिने मोठी आहे.
परिवाराची चर्चा
या नात्यामुळे भलेही डियाना आणि पती स्टीवेन आनंदी असले तरी पूर्ण परिवारात फारच कन्फ्यूजन आहे. डियानाचं आधीचं लग्न 22 वर्ष चाललं होतं. अशात तिला पहिल्या लग्नातून 13 ते 31 वर्षाचे चार मुलं आहे. ज्यांचा सावत्र पिता स्टीवेन फार तरूण आहे. प्लंबर म्हणून काम करणाऱ्या स्टीवेन याबाबत परिवाराला सांगितलं होतं तेव्हा सगळे हैराण झाले होते. लोकांनी त्याच्यासोबत बोलणं सोडलं होतं. आता हळूहळू सगळं ठीक होत आहे.