ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क ब्लँकेटच्या प्रेमात पडली, लग्नगाठही बांधली, आनंदात जगतेय आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:06 PM2023-01-18T13:06:34+5:302023-01-18T13:07:25+5:30
पास्कलने तिच्या बॉयफ्रेंडसमोरच ब्लँकेटसोबत 'लग्न' केलं. आता ती तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत आहे.
लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एका महिलेने बॉयफ्रेंडला सोडून चक्क ब्लँकेटसोबत लग्न केलं आहे. पास्कल सेलिक असं या महिलेचं नाव आहे. तो तिच्या आयुष्यातील हे सर्वात अर्थपूर्ण नातं आहे. ती पहिल्या नजरेतच ब्लँकेटच्या प्रेमात पडली होती असंही तिने सांगितलं. पास्कलने तिच्या बॉयफ्रेंडसमोरच ब्लँकेटसोबत 'लग्न' केलं. आता ती तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत आहे.
पास्कलने 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ओपम वेडिंग सेरेमनीचं आयोजन केले होतं. ती म्हणते की, ती पहिल्या नजरेत तिच्या ब्लँकेटच्या प्रेमात पडली आणि त्याला तिचा विश्वासू साथीदार मानते. डेली स्टारच्या वृत्तानुसार, तिने इंग्लंडच्या एक्सेटर शहरात ब्लँकेट्ससोबत लग्न केलं होतं आणि आपल्या कुटुंबासह बॉयफ्रेंडलाही आमंत्रित केले होते. एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना, पास्कल म्हणाली की तिच्याकडे इतर अनेक ब्लँकेट्स आहेत, परंतु हे सर्वात प्रामाणिक आहे, कारण ते तिला उबदार आणि आराम देतं.
Pascale Sellick married her #duvet says her boyfriend is 'very proud' and not jealous pic.twitter.com/OFnaAWcr1M
— Patriot (@NamoTheBestPM) January 13, 2023
पास्कल म्हणाली की, ब्लँकेटसोबत तिचे नाते मित्रासारखे आहे. दुःखात आणि सुखात तो तिच्यासोबत राहतो. जेव्हा तिला तिच्या प्रियकराबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले की, ब्लँकेटशी लग्न करण्याचा हेतू प्रियकराला माहीत आहे. आमचे खरोखर प्रेमळ नाते आहे. त्याला माझ्या ब्लँकेटचा हेवा वाटत नाही, पण त्याला माझा अभिमान आहे.
सेल्फ लव्हला महत्त्व देण्यासाठी तिने लग्न केल्याचं म्हटलं आहे. जेणेकरून लोकांना समजेल की प्रेम शोधण्यासाठी नातेसंबंधात असणे आवश्यक नाही. पास्कलने ब्लँकेट घालून लग्न केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचे फोटोही खूप शेअर केले जात आहेत. याची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"