काय सांगता! योग्य व्यक्तीच्या शोधात महिलेने १० वेळा केली लग्ने, म्हणाली - भेटला नाही मिस्टर परफेक्ट...
By अमित इंगोले | Published: October 30, 2020 02:55 PM2020-10-30T14:55:19+5:302020-10-30T15:07:22+5:30
अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे Cassey. या महिलेने एकापाठी एक १० लग्ने केली. तिचं सर्वात जास्त टिकलेलं लग्न ८ वर्षे होतं.
ते म्हणतात ना जीवनात एखादा माणूस यावा तर योग्य यावा नाही तर येऊ नये. एका महिलेने याचं बेस्ट उदाहरण दिलं आहे. या महिलेने १० वेळा लग्न केलं. पण तिला आजपर्यंत परफेक्ट मॅच मिळाला नाही. सध्या या महिलेची चर्चा रंगली आहे. सामान्यपणे आपल्याकडे परफेक्ट मॅचच्या शोधात मुलं-मुली उशीरा लग्न करतात. पण या महिलेला तर १० लग्ने करूनही मिस्टर परफेक्ट मिळाला नाही.
अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे Cassey. या महिलेने एकापाठी एक १० लग्ने केली. तिचं सर्वात जास्त टिकलेलं लग्न ८ वर्षे होतं. तर तिचं सर्वात कमी काळ टिकलेलं लग्न ६ महिनेच होतं. सध्या ती लवकरच तिच्या १० व्या रिलेशनशिप मधूनही बाहेर पडणार आहे. ५६ वर्षीय Cassey ही एका चॅट शोचा भाग झाली होती. ज्यात ती रिलेशनशिपबाबत सल्ला देत होती.
यावेळी एका व्यक्तीने या महिलेला विचारले की, जेव्हा तुम्ही सांगता की, तुम्ही १० लग्ने केली आहेत. तर त्यात एक गर्वही असतो. पण कधी तुम्हाला या गोष्टीवर हसू आलं का? यावर Cassey ने उत्तर दिलं की, कधी कधी तर अशी वेळ येते की, मला हसू आणि रडू दोन्ही येतं.
या महिलेने सांगितले की, जेव्हा मी लग्नाचं आयुष्य जगत असते तेव्हा मला वाटतं की आता बस आणखी नाही होऊ शकणार. तेव्हा मी बोलते की, चला आपण घटस्फोट घेऊ. तिने सांगितले की, 'मला काहीच फरक पडत नाही की, मी किती लग्ने करते. पण जोपर्यंत मला प्रेम करणारी व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत मी हे करत राहणार'.
दरम्यान, तशी तर अमेरिकेसारख्या देशात या फार कॉमन गोष्टी आहेत. पण एका परफेक्ट मॅचपर्यंत पोहोचण्याचा अधिकार तर सर्वांनाच असला पाहिजे. योग्य व्यक्तीलाच जीवनात जागा दिली गेली पाहिजे. याबाबतीत अजिबात क्रॉम्प्रमाइज करू नये.