ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:07 PM2022-04-26T16:07:43+5:302022-04-26T16:12:58+5:30

Woman Married Pet Cat: "मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही" असं म्हणत एका महिलेने थेट पाळीव मांजरीसोबत लग्न केलं आहे.

woman marries with beloved pet cat so landlords can not force leave the animal | ऐकावं ते नवलच! 'ती' चक्क मांजरीच्या प्रेमात पडली अन् लग्नगाठही बांधली, कारण ऐकून व्हाल हैराण

फोटो - झी न्यूज

Next

प्राण्यांबाबत अनेकांना अत्यंत जिव्हाळा असतो. आवड असल्य़ाने काही जण आपल्या घरात कुत्रा, मांजर हे पाळतात. त्यांची नीट काळजी देखील घेतात. काही लोक प्राण्यांच्या इतक्या प्रेमात असतात की त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. "मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही" असं म्हणत एका महिलेने थेट पाळीव मांजरीसोबत लग्न केलं आहे. डेबोरा हॉज असं या महिलेचं नाव असून सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

49 वर्षीय डेबोरा हॉजने एका पार्कमध्ये समारंभ आयोजित करून तिच्या आवडत्या मांजरीशी लग्न केलं. महिलेची अडचण अशी होती की तिच्या घराचे मालक अनेकदा तिला पाळीव प्राणी आपल्यासोबत ठेवण्यास मनाई करत होते. त्यावर उपाय म्हणून महिलेनं तिच्या पाळीव मांजरीशीच लग्न केलं.डेबोराने एका पार्कमध्ये लग्नसोहळा आयोजित केला होता. तिने स्वतः टक्सिडो सूट घातला होता आणि गोल्ड लेम मांजरीसह तिने सोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली. 

द सनच्या वृत्तानुसार, डेबोराचा दावा आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून तिचे घरमालक तिला 2 कुत्रे आणि एका मांजरीमुळे घरात राहू देत नव्हते. तिला वारंवार घरं बदलावी लागत होती. डेबोरा सांगते की ती तिच्या कॅटशिवाय जगू शकत नाही. आपल्या मुलांनंतर या मांजरीला आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मानते. यामुळे तिला आपल्या मांजरीपासून दूर जाण्याची भीती सतावत होती. अशात तिने मांजरीसोबत लग्न करून पती-पत्नी बनण्याचा निर्णय घेतला.

डेबोराने एका सिव्हल सेरेमनीमध्ये लग्न केलं, ज्यामध्ये तिचे मित्र-मैत्रिणीही उपस्थित होते. त्यांना हे सगळं विचित्र वाटलं पण सगळ्यांना मजा आली. मात्र त्यांनी आपल्या मुलांना या उत्सवात सहभागी केलं नाही कारण त्यांना ते योग्य वाटलं नाही. मांजर 2017 पासून डेबोरासोबत राहत आहे. त्यामुळेच महिलेने तिच्याशीच लग्नाचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman marries with beloved pet cat so landlords can not force leave the animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.