२० वर्षापर्यंत स्वत:चं नाव चुकीच्या पद्धतीने सांगत होती महिला, पण असं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:56 PM2021-09-01T16:56:23+5:302021-09-01T16:57:08+5:30
एक महिला गेल्या २० वर्षापासून स्वत:च आपलं नाव चुकीच्या पद्धतीने घेत होती. हे तिने केलं कारण लोक तिच्या नावाचा योग्य उच्चार करू शकत नव्हते.
आपली ओळख आपल्या नावाने असते. हेच कारण आहे की प्रत्येत व्यक्तीचं नाव खास असतं. पण जरा विचार करा की, कुणी तुमचं नाव बिघडवलं किंवा तुमच्या नावासोबत विचित्र काहीतरी रायमिंग केलं तर काय होईल. अर्थातच कुणालाही राग येईल. पण एक महिला गेल्या २० वर्षापासून स्वत:च आपलं नाव चुकीच्या पद्धतीने घेत होती. हे तिने केलं कारण लोक तिच्या नावाचा योग्य उच्चार करू शकत नव्हते.
नॉटिंघमशायरमध्ये राहणाऱ्या ज्योतीने सांगितलं की, 'शाळेत मला जोटी म्हटलं जात होतं आणि मला आठवतं की, लोक या नावाला पॉटीसोबत गात होते. मला त्यावेळी फार वाईट वाटत होतं. त्यामुळे मी माझ्या आईला एक दिवस म्हणाले होते की, आपण हे नाव बदलू शकतो का? जेणेकरून लोक मला ज्योतीऐवजी गोटी नावाने आवाज देतील. असं केल्यास ते या नावाला पॉटीसोबत जोडणार नाहीत. बस तेव्हापासूनच माझं नाव गोटी झाली.
त्यासोबतच ज्योतीने सांगितलं की, जर लोक त्चिकोवस्की म्हणायला शिकू शकता तर ते ज्योतीचं उच्चारणही करू शकतात. यालाच ध्यानात ठेवून गेल्यावर्षी तिने तिचं मन बदललं. तिच्या एका मैत्रिणीने तिच्या नावाचं योग्य उच्चारण शिकली. यातून तिला तिचं नाव योग्यप्रकारे वापरण्याची प्रेरणा मिळाली. आता जेव्हाही ज्योती एखाद्या नव्या व्यक्तीला भेटते, तेव्हा ती तोपर्यंत नाव सांगत राहते जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याचा योग्य उच्चार करत नाही.
ज्योती म्हणाली की, जेव्हा मी एखाद्या भारतीय व्यक्तीसोबत असते तेव्हा मी नाव नेहमीच योग्य सांगते. कारण मला माहीत होतं की, ते उच्चार योग्य करण्यात सक्षम असतील. खरं बघायला गेलं तर अनेकदा मीच लोकांना हे नाव योग्यपणे बोलण्याची संधी दिली नाही. जीवनात मला फार उशीरा जाणीव झाली की, लोक त्चिकोवस्की आणि यापेक्षीही कठीण नावांचा योग्य उच्चार करू शकता तर ज्योतीचा करू शकत नाही.