पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:25 PM2021-07-11T16:25:09+5:302021-07-11T16:25:43+5:30

काहीवेळा असे गुन्हे घडतात की पोलिसही चक्रावून जातात. अशावेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मध्यप्रदेशात एक अशीच घटना घडली आहे.

A woman with a mother of five wants to marry a 30-year-old man, daughter lodged a complaint | पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल

पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल

Next

काहीवेळा असे गुन्हे घडतात की पोलिसही चक्रावून जातात. अशावेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मध्यप्रदेशात एक अशीच घटना घडली आहे. एका महिलेचा उपद्व्याप सर्वांच्या समोर आला आहे. या महिलेच्या मुलीनेच तक्रार केली की तिची आई पाचवं लग्न करत होती. गेलात ना तुम्हीपण चक्रावून? 

मध्यप्रदेशातल्या भिंड या गावात ही घटना घडली आहे. ज्यांनी ज्यांनी ही घटना ऐकली ते चक्रावूनच केले आहेत. या महिलेची आधी चार लग्न झाली आहेत. या लग्नातून तिला पाच मुलीही आहेत. तिच्या दोन पतींचा मृत्यू झाला आणि दोन पतींनी तिला सोडून दिले. तिचं वय ४५ वर्षं आहे. तिचं आता ३० वर्षाच्या मुलाशी प्रेम जमलं आहे. पाच मुलांची आई असलेल्या या महिलेच्या पहिल्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. तिने आणि तिच्या पतीने म्हणजे या महिलेच्या जावयानेच तिची पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.  

मुली आणि जावयाच्या तक्रारीवर महिला मात्र ठाम आहे. तिला त्या युवकाशी लग्न करायचंच आहे. ती म्हणते, की मी माझ्या मुलीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा राग येऊन तिने ही तक्रार केली आहे. दरम्यान ही महिला त्या ३० वर्षाच्या युवकासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिच्या दुसऱ्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. पोलिस ठाण्यात ही तक्रार आल्यानंतर पोलिसांना यावर काय तोडगा काढावा तेच समजत नाहीये.

Web Title: A woman with a mother of five wants to marry a 30-year-old man, daughter lodged a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.