खिडकीतून खाली उडी मारणार होती महिला, 'वरून' आलेल्या आलेल्या व्यक्तीने दिला धक्का आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:55 PM2022-10-17T13:55:08+5:302022-10-17T13:57:32+5:30
Woman Rescue by Fire Staff: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आत्महत्येच्या घटना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
Woman Rescue by Fire Staff: तशी तर आत्महत्येची घटना फारच दुर्दैवी आणि दु:खद आहे. पण बॉलिवूड सिनेमा शोलेच्या टाकीवर चढण्याच्या सीनने अशी आत्महत्या करणं जरा जास्त प्रचलित आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आत्महत्येच्या घटना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत जपानमधल्या एका शहरातील आहे. या एक महिला उंच इमारतीच्या खिडकीतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण एका व्यक्तीने तिचा जीव वाचवला. ही व्यक्ती फायर ब्रिगेड विभागातील आहे. महिला जेव्हा उडी मारते तेव्हा हे सगळं होतं. तेव्हाच ही व्यक्ती तिथे पोहोचते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आत्महत्या करणार होती आणि खाली लोकांची गर्दी जमा झाली होती. तिला सगळे अडवत होते. व्हिडीओत दिसत आहे की, महिला खिडकीत बसली आहे आणि तिचे दोन्ही पाय खाली लटकत आहेत. तेव्हा फायर बिग्रेडचा एक कर्मचारी दोरीने लटकत खाली येतो.
Vid of a Japanese firefighter rescuing a suicidaI lady was a job well-done 🔥😂😂😂😂😫 pic.twitter.com/8ocMHJahPN
— Communicator of Ilorin (@usman__haruna) October 13, 2022
हे महिलेला माहीत नसतं आणि तो वरून खाली येत महिलेला जोरदार धक्का देतो. यानंतर महिला मागे रूममध्ये पडते. तिचा जीव वाचतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.