टॉयलेटचा दरवाजा समजून महिलेने उघडला विमानाचा इमरजन्सी दरवाजा आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 02:56 PM2019-06-10T14:56:25+5:302019-06-10T15:00:08+5:30
जरा विचार करा की, तुम्ही विमानात प्रवास करत आहात आणि अचानक विमानाचा मुख्य दरवाजा उघडला गेला तर काय हालत होईल.
(Image Credit : Business Recorder)
जरा विचार करा की, तुम्ही विमानात प्रवास करत आहात आणि अचानक विमानाचा मुख्य दरवाजा उघडला गेला तर काय हालत होईल. नेमकं काय होईल याचा अंदाज तर लावता येणार नाही, पण अशावेळी काही सुचणं बंद नक्कीच होईल. असंच काहीसं प्रत्यक्षात घडलं. एका महिलेने विमानाचा आपातकालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
पीके ७०२ क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय विमानात प्रवास करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने चुकून विमानाचा आपातकालीन दरवाजा उघडला. त्यानंतर काय आरामात प्रवासाची अपेक्षा करत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. महिने आपातकालीन दरवाजा टॉयलेटचा दरवाजा म्हणून उघडला होता.
पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं पीके ७०२ हे विमान शनिवारी सकाळी मॅनचेस्टर एअरपोर्टवर उभं होतं. यादरम्यान विमानातील एका महिलेने बटन दाबलं आणि आपातकालीन दरवाजा उघडला गेला.
पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या घटनेमुळे विमाना सात तास लेट झालं. महिलेच्या चुकीमुळे इमरजन्सी स्लोप सक्रिय झाला. या घटनेनंतर लगेच स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसीजरनुसार, साधारण ४० प्रनाशांना त्यांच्या सामानासोबत खाली उतरवण्यात आलं. पीआयएने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे महिलेने हे स्पष्ट केलं आहे की, तिने टॉयलेटचा दरवाजा समजून बटन दाबलं होतं.