Online Food Parcel, Trending Story: जेवण ऑर्डर केलं अन् पार्सलमधून आले बक्कळ पैसे... वाचा नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:06 PM2022-09-22T19:06:44+5:302022-09-22T19:08:22+5:30

पार्सलमध्ये जेवणाच्या जागी नोटांची बंडल आलं कसं... नंतर झाला उलगडा

Woman ordered food online but she got money in parcel kfc America Trending Story | Online Food Parcel, Trending Story: जेवण ऑर्डर केलं अन् पार्सलमधून आले बक्कळ पैसे... वाचा नक्की काय घडलं

Online Food Parcel, Trending Story: जेवण ऑर्डर केलं अन् पार्सलमधून आले बक्कळ पैसे... वाचा नक्की काय घडलं

Next

Online Food Parcel Order, Trending Story: ऑनलाइन फूड पार्सलची वेगवेगळी प्रकरणे हल्ली समोर येत आहेत. फूड पार्सलमध्ये खराब झालेले अन्न येणे किंवा अन्नामध्ये एखादा मेलेला प्राणी किंवा काही विचित्र गोष्टी सापडण्याची प्रकरणे बरेचदा घडतात. त्यानंतर ऑर्डर मागवेलेले ग्राहक त्या संबंधित कंपनी त्या ब्रँडवर कारवाईही करते. अशीच अनेक प्रकरणे दिसतात. पण आता मात्र अमेरिकेतून एका महिलेने ऑनलाइन फूड पॅकेट मागवले असताना एक वेगळीच घटना घडली. आधी कधीही असं न घडलेल्या अशा या घटनेने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

फूड पार्सलच्या बाबतीतील ही घटना अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका महिलेने KFC फूड डिलिव्हरी कंपनीकडून चिकन सँडविच मागवले होते. ती बाई वाट पाहत होती की आपले जेवण येईल आणि ती जेवेल. महिलेचे जेवण आले पण त्यातून जे निघाले ते पाहून ती महिला अवाक् झाली. तिच्या फूड पॅकेटमधून नोटांचे बंडल निघाले. घडलेला प्रकार पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या पॅकेटमध्ये नोटांच्या बंडलांतून एकूण ४३ हजार डॉलर्स निघाले.

असं कसं घडलं? पैसे कुणाचे होते?

अचानक इतके पैसे फूड पार्सलमधून आल्यानंतर याचं काय करायचं असा प्रश्न त्या बाईला पडला होता. अखेर तिने प्रामाणिकपणे कंपनीला फोन केला आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर काही कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचले असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. महिलेचे जेवणाचे पाकीट पॅक केले जात होते, त्याच वेळी फूड कंपनीच्या मॅनेजरच्या चुकीमुळे काऊंटरवरील काही रक्कम तिच्या पाकिटात भरली गेली होती. महिलेने प्रकरण स्पष्ट केल्यानतर ही बाब कंपनीच्या लक्षात आली.

महिलेच्या प्रामाणिकपणावर कंपनी आणि कर्मचारी खुश होते. मॅनेजरने त्या महिलेचे आभार मानले. कारण त्या महिलेने प्रामाणिकपणा दाखवला नसता तर पैसे गेले असतेच, पण त्यासोबतच मॅनेजरची नोकरीही जाऊ शकली असती. महिलेनेही याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की तिने चिकन सँडविच ऑर्डर केले होते आणि त्यातून पैसे निघाले. ती महिलेवर सध्या एक छोट्या रकमेचे कर्ज आहे पण तिने ते पैसे त्या कर्जाच्या परतफेडीसाठी न वापरता परत केले.

Web Title: Woman ordered food online but she got money in parcel kfc America Trending Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.