बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचं असं दु:खं, तरूणीने स्वत:च्या अंत्य संस्काराचं केलं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:57 PM2023-11-06T13:57:29+5:302023-11-06T13:58:11+5:30

तरूणीने आपल्या अंत्य संस्काराला मित्र-मैत्रिणींना बोलवलं. वांगचं बॉयफ्रेंडसोबत तीन वर्ष रिलेशन होतं. दोघांचं सहा महिन्यांआधीच ब्रेकअप झालं.

Woman organised own funeral to move on in life compare break up boyfriend with death China | बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचं असं दु:खं, तरूणीने स्वत:च्या अंत्य संस्काराचं केलं आयोजन

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचं असं दु:खं, तरूणीने स्वत:च्या अंत्य संस्काराचं केलं आयोजन

एका तरूणीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. ज्याचा तिला इतकं दु:खं झालं की, तिने तिच्या या स्थितीची तुलना मृत्युसोबत केली. हैराण करणारी बाब म्हणजे तिने रितसर तिच्या अंत्य संस्काराचं आजोजन केलं. यावरून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 25 वर्षीय या तरूणीचं नाव वांग आहे. ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. तिने अंत्य संस्काराला मित्र-मैत्रिणींना बोलवलं. वांगचं बॉयफ्रेंडसोबत तीन वर्ष रिलेशन होतं. दोघांचं सहा महिन्यांआधीच ब्रेकअप झालं.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, वांग म्हणाली की, ती नुकतीच अनेक लग्नांमध्ये गेली होती. तिने तिच्या मित्राना विचारलं की, ते कधी तिच्या लग्नात येतील. याच कारणाने तिने ब्रेकअपची तुलना आपल्या मृत्युसोबत केली आणि यानंतर एक नवीन आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं. ती म्हणाली की, ती आता बॉयफ्रेंडशिवाय जगण्याला सुरूवात करेल. वांगने आपल्या अंत्य संस्कारात अनेक मित्राना बोलवलं. तिने याचं आयोजन फुलांच्या एका दुकानात केलं होतं. दुकानाच्या मालकाने वांगची स्थिती पाहून तिला इथे अंत्य संस्कार आयोजनाची परवानगी दिली होती.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात वांग मेणबत्त्या लावलेल्या एका बेडवर लेटलेली दिसली. तर तिचे मित्र-मैत्रिणी तिला वाकून फुलं देत आहेत. जसं अंत्य संस्कारात केलं जातं तसंच इथे करण्यात आलं. त्यानंतर ती उभी झाली आणि मित्रांसोबत जीवन व मृत्युबाबत चर्चा केली. वांग म्हणाली की, अंत्य संस्कार दु:खातून बाहेर निघण्याचा एक पर्याय होता. बॉयफ्रेंडचे आई-वडील लग्नासाठी तयार होत नव्हते. त्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं. वांगला तिचे आई-वडील एकटीला गावात सोडून शहरात गेले होते. त्यामुळे तिचं बालपण चांगलं गेलं नाही.

वांग म्हणाली की, तिला तिचा अंत्य संस्कार करण्याचा काहीच पश्चाताप नाही. ती आता जीवनाची नव्याने सुरूवात करेल. चीनी सोशल Douyin वर लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी वांगबाबत सहानुभूती दर्शवली.

Web Title: Woman organised own funeral to move on in life compare break up boyfriend with death China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.