एका दुर्मिळ आजारामुळे पोटात बनत होता गॅस, 8 वर्षापासून जेवत नाहीये तरूणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:29 PM2024-04-30T16:29:43+5:302024-04-30T16:31:04+5:30
लिव म्हणाली की, 3 वर्षाची असतानापासून तिला जेवण करताना पोटात वेदना होत होत्या.
पोटात गॅस होणं किंवा अॅसिडिटी होणं या समस्या सामान्य समजल्या जातात. पण या समस्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा गंभीरतेने न घेणं महागतही पडू शकतं. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय लिव रोज नावाच्या तरूणीसोबतही असंच झालं. जेव्हा लिव 18 वर्षाची होती तेव्हा तिला पोटात गॅस होण्याची समस्या होत होती. असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सामान्य अॅसिडिटी असल्याचं सांगितलं. पण तिचं दुखणं काही कमी झालं नव्हतं. नंतर जेव्हा गंभीरतेने टेस्ट केल्या गेल्या तेव्हा समजलं की, तिला गॅस्ट्रोपेरेसिस आजार झाला आहे. ज्यामुळे ती आता गेल्या 8 वर्षापासून काहीच खाऊ शकत नाहीये. तिला हृदयावाटे जेवण दिलं जातं.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, लिव म्हणाली की, 3 वर्षाची असतानापासून तिला जेवण करताना पोटात वेदना होत होत्या. ती अनेकदा डॉक्टरांकडे गेली. पण कुणीही तिला गंभीर आजार असल्याचं सांगितलं नव्हतं. हळूहळू वेदना खूप वाढल्या. 17 वर्षाची झाली तेव्हा समस्या खूपच वाढली. काहीही तेल मसाल्याचं खाल्लं तर तिला उलटी होत होती. अन्न पचत नव्हतं. भूक लागत होती, पण काही खाल्लं तर वेदना होत होत्या. नंतर तिला डॉक्टरांनी ईटिंग डिसऑर्डर असल्याचं सांगितलं. अनेक टेस्ट केल्यावर समजलं की, तिला एक दुर्मिळ आजार आहे. याला पोटाचा लकवाही म्हणतात. यात आतड्या व्यवस्थित काम करत नाहीत.
कसं देतात जेवण
आता डॉक्टर तिला हिकमॅन लाइनमधून आहार देतात. ही लाइन सरळ हृदयापर्यंत जाते, तिथून रक्ताच्या माध्यमातून शरीराला पोषण दिलं जातं. दूध पिण्यासाठी नाकात नळी टाकली आहे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही हिकमॅन लाइन रोज साफ करावी लागते.
लिवच्या दर दोन आठवड्यांनी ब्लड टेस्ट केल्या जातात. तिची एक नस बदली गेली आहे. ज्यावर सर्जरी करण्यात आली आणि नस कापून काढण्यात आली. त्याजागी कृत्रिम नस बसवली आहे. लिव म्हणाली की, मला आता आधीपेक्षा बरं वाटतं. पण माझ्या घरातील सगळे जेवण असतात, तेव्हा मलाही भूक लागते. त्यामुळे त्यावेळी मी माझ्या रूममध्येच राहते.