आपल्या केसांनी १२ हजार किलोची बस ओढ भा्रतीय महिलेने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:30 PM2022-01-04T18:30:38+5:302022-01-04T18:39:29+5:30

जे आपल्याला अशक्य वाटतं. ते एका महिलेने प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. एका भारतीय महिलेने आपल्या केसांनी चक्क १२ हजार किलोची डबल डेकर बस खेचली आहे .

woman pulls 12 thousand kg bus makes Guinness world record | आपल्या केसांनी १२ हजार किलोची बस ओढ भा्रतीय महिलेने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

आपल्या केसांनी १२ हजार किलोची बस ओढ भा्रतीय महिलेने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

googlenewsNext

हल्ली बहुतेक लोक केसगळतीने त्रस्त आहेत. केस धुताना, विंचरताना, पुसतानाही ते गळतात. असं असताना केसांनी एखादी वस्तू खेचून दाखवणं म्हणजे आश्चर्यच वाटेल. खरंतर यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. हे शक्यच नाही असं तुम्ही म्हणाल. पण जे आपल्याला अशक्य वाटतं. ते एका महिलेने प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. एका भारतीय महिलेने आपल्या केसांनी चक्क १२ हजार किलोची डबल डेकर बस खेचली आहे .

आशा रानी या भारतीय महिलेचं कौशल्य पाहून तर संपूर्ण जग थक्क झालं आहे (Asha Rani Pull Bus with Hair). अगदी गिनीज बुकनेही तिची नोंद घेतली आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव कोरलं गेलं आहे (Indian Woman Guinness World Record).

आशाने तब्बल १२ हजार २१६ किलोची डबल डेकर बस आपल्या केसांनी खेचून विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता आशाने दोन वेण्या बांधल्या आहेत. त्यांना दोरी बांधून ही दोरी बसला बांधण्यात आली आहे. ती आपली पूर्ण ताकद लावून बस ओढते आणि अगदी सहजपणे ती फक्त केसांनीच बस खेचते.

आशाने इटलीतील मिलानमध्ये लो शो डी रिकॉर्ड नावाच्या एका कार्यक्रमात लंडन डबल डेकर बस आपल्या केसांनी खेचली होती. त्यानंतर तिला लोक आयर्न क्वीन म्हणू लागले. आता आशाच्या नावावर 7 गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड आहेत. आशा एक वेट लिफ्टर आहे आणि वेट लिफ्टिंगशी संबंधीत कौशल्य असल्याने तिने हे करतब अगदी सहजपणे करून दाखवलं.

आशाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे. याला म्हणतात मजबूत केस अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर दुसऱ्या युझरने माझेही केस मजबूत आहेत. पण का कारनामा फक्त मजबूत केसांचा खेळ नाही तर पायही मजबूत असायला हवेत, असं म्हटलं आहे.

Web Title: woman pulls 12 thousand kg bus makes Guinness world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.