पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:00 PM2023-08-18T13:00:20+5:302023-08-18T13:00:51+5:30
महिलेने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल.
पाळीव श्वानावर सगळे लोक खूप प्रेम करतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळी औषधं देतात. पण एका महिलेला असं करणं चांगलंच महागात पडलं. तिने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल.
डेली मेलनुसार, पश्चिम सिडनीमध्ये राहणाऱ्या या महिलेकडे एक श्वान होता. त्याचं नाव लोका होतं. हा हवानीस प्रजातीचा होता. औषधामुळे त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टममध्ये सांगण्यात आलं की, श्वानाला एका वर्षात चार वेळा मेथामफेटामाइन आणि ओपिओइडसहीत अनेक ड्रग्स देण्यात आले होते. डॉक्टरांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेही हैराण झाले की, महिलेने पाळीव श्वानासोबत असं का केलं.
इंस्पेक्टर स्कॉट मायर्स यांनी सांगितलं की, हा बेजबाबदारपणा समजण्या पलिकडचा आहे. हा श्वान कसा पुन्हा पुन्हा बेकायदेशीर औषधांचं सेवन करत होता. हे फार चुकीचं आहे आणि कोर्टाने यासाठी कठोर शिक्षा द्यावी.
जास्तीत जास्त लोक आपल्या पाळीव प्राण्यांना आपल्या अपत्यासारखे पाळतात आणि त्यांची काळजी घेतात. पण या महिलेने असं का केलं? हे समजू शकलं नाही. अशात कोर्टाने महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच तिच्यावर पाळीव प्राणी ठेवण्यास 5 वर्ष बंदी घालण्यात आली आहे.
जेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेची चौकशी केली तेव्हा तिने दावा केला की, लोकाने एका पार्कमध्ये चुकून ड्रग्सचं सेवन केलं होतं. ही दोन्ही औषधं एखाद्या विषासारखी कामं करतात आणि महिलेने चार वेळा त्याला ही औषधं दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.