आय ड्रॉप समजून महिलेने डोळ्यात टाकला गोंद आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:26 IST2023-10-05T16:25:11+5:302023-10-05T16:26:36+5:30
महिलेने चुकून आपल्या डोळ्यात गोंद टाकला, ज्यानंतर तिला लोक वेड्यात काढत आहेत.

आय ड्रॉप समजून महिलेने डोळ्यात टाकला गोंद आणि मग...
अनेकदा लोक आपल्या अवयवांची हवी कशी काळजी घेत नाहीत. दुर्लक्ष करण्याचा परिणाम असा होतो की, शरीरात अशी काही समस्या होते जी चांगलीच महागात पडते. एका महिलेचा बेजबाबदारपणा तिला असाच महागात पडला. महिलेने चुकून आपल्या डोळ्यात गोंद टाकला, ज्यानंतर तिला लोक वेड्यात काढत आहेत.
ट्विटर अकाउंट @cctvidiots वर एका महिलेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो व्हायरल झालाय. या महिलेने चुकून आपल्या डोळ्यात सुपर ग्लू टाकला. महिलेचं नाव जेनिफर एवरसोल (Jennifer Eversole) असून ती कॅलिफोर्नियाच्या सॅंटा रोजामध्ये राहते. ती सहा मुलांची आहे आहे.
महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत जून महिन्यात सांगितलं होतं. टिकटॉकवर तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. तिने सांगितलं की, घरात आय ड्रॉप आणि सुपर ग्लू आजूबाजूला ठेवलं होतं. तिने फार काही लक्ष दिलं नाही आणि आय ड्रॉपच्या जागी डोळ्यात सुपर ग्लू टाकला.
Woman mistakes super glue for eye drops pic.twitter.com/Ca50qiDTjc
— CCTV IDIOTS (@cctvidiots) October 2, 2023
त्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिने सांगितलं की, डोळ्यात ग्लू टाकल्यानंतर तिने लगेच डोळे घट्ट बंद करून घेतले होते. ज्यामुळे गोंद जास्त आत गेला नाही. पण गोंद पापण्यांवर चिकटला. जर तिने डोळे लगेच बंद केले नसते तर जास्त नुकसान झालं.