असंही प्रेम! महिलेने हरवलेल्या कुत्रीला शोधण्यासाठी सोडली चक्क नोकरी आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:10 PM2019-09-25T13:10:29+5:302019-09-25T13:18:05+5:30
आपल्या पाळीव कुत्र्यावर लोकांचं किती प्रेम असतं हे आपण नेहमीच बघत असतो. मात्र, एका महिलेने तर तिचा हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी चक्क नोकरी सोडली.
आपल्या पाळीव कुत्र्यावर लोकांचं किती प्रेम असतं हे आपण नेहमीच बघत असतो. मात्र, एका महिलेने तर तिचा हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी चक्क नोकरी सोडली. ही घटना वॉशिंग्टनची असून रिपोर्टनुसार, जुलै महिन्यात कॅरोल आणि वर्ने किंग त्यांचा कुत्रा सोबत घेऊन मोंटानाला फिरायला गेले होते. पण इथे कुत्रा हरवला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण काही पत्ता लागला नाही. या कुत्रीचं नाव आहे कॅटी असं आहे. जवळपास दोन महिन्यांच्या शोधानंतर ही कुत्री अमेरिकेतील दुसऱ्याच एका राज्यात सापडली.
७ वर्षीय कॅटी जरा कमजोर होती. महिलेने सांगितले की, कॅटीला विजांच्या आवाजाने भीती वाटली असावी आणि हॉटेलच्या रूममधून पळून गेली असावी. त्यांनी सगळीकडे तिचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवसापासून किंग कुत्रीचा शोध घेण्यासाठी पोस्टर लावले आणि इंटरनेटचीही मदत घेतली.
किंग सांगतात की, आजूबाजूच्या शहरांमध्ये तब्बल ५०० पोस्टर लावले होते. इतकेच नाही तर कपलने कॅटीला शोधण्यासाठी गेम कॅमेरा आणि अंधारात बघू शकणारे चष्मेही विकत घेतले. काही दिवसातच कॅटीची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली. किंग सांगतात की, त्यांनी हार मानली नव्हती आणि आशाही सोडली नव्हती. कॅटीला शोधण्यासाठी त्यांनी नोकरीही सोडली.
१५ सप्टेंबरला त्यांना एक फोन आला. त्यावर त्यांना सांगण्यात आलं की, यार्डमध्ये कॅटीसारखा दिसणारा एक डॉगी आहे. याच परिसरात किंग कॅटीचे पोस्टर लावून गेल्या होत्या. तिथे एक कॅटीसारखा कुत्रा असल्याची माहिती मिळताच किंग मैत्रीणीसोबत तेथे पोहोचल्या. पण तोपर्यंत कॅटी तेथून गायब झाली होती.
कॅटी तेथून गेल्याच्या निराशेत किंग आजूबाजूला फिरत होत्या आणि लोकांना कॅटीबाबत विचारत होत्या. काही वेळाने एक महिला त्यांना भेटली आणि झाडाजवळ एक कुत्रा असल्याची माहिती दिली. आणि विचारले की, हा कुत्रा तुमचा आहे का?, किंग यांनी पाहिलं तर ती कॅटी होती. किंग यांनी लगेच कॅटीला जवळ घेतलं. ती फार कमजोर झाली होती, त्यामुळे तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आता कॅटी ठीक आहे.