महिलेला समजलं बॉयफ्रेन्डचं सुरू आहे दुसरं अफेअर, सूड घेण्यासाठी बनली नकली HR आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:17 PM2022-04-15T18:17:24+5:302022-04-15T18:17:59+5:30
Jarahatke : लोकांना जेव्हा रिलेशनशिपमध्ये दगा मिळतो तेव्हा ते सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशात ते हाही विचार करत नाही की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे की बरोबर. एका तरूणीने असंच केलं.
Jarahatke : प्रेमात जर दगा मिळाला तर व्यक्ती निराश होऊन डिप्रेशनमध्ये जातो किंवा सगळंकाही विसरून नव्या जीवनाची सुरूवात करतो. काही लोक हे तिसरा मार्ग निवडतात तो म्हणजे सूडाचा मार्ग. लोकांना जेव्हा रिलेशनशिपमध्ये दगा मिळतो तेव्हा ते सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशात ते हाही विचार करत नाही की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे की बरोबर. एका तरूणीने असंच केलं.
'डेली स्टार' रिपोर्टनुसार, कायला नावाच्या महिलेने सोशल मीडिया साइट टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेन्ड आणि आधीच्या रिलेशनशिपमध्ये मिळालेल्या वेदनेची माहिती दिली. तिने सांगितलं की, तिने कशाप्रकारे सूड घेतला. त्याचं लोक कौतुक करत होते.
कायलाने सांगितलं की, जेव्हा तिला समजलं की, तिच्या बॉयफ्रेन्ड दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे तर तिने त्याला सोडलं. त्यानंतर तिने सूड घेण्याचा निर्णय घेतला. कायलाने बराच विचार केल्यावर सूड घेण्याचा प्लान केला. यासाठी तिने नकली एचआर बनून आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला फोन केला. एक महिना नोकरीची प्रोसेस करत राहिली. बॉयफ्रेन्डलाही वाटलं की, नोकरी बदलायचीच आहे त्यामुळे तो प्रोसेस करत राहिला. एक महिन्यानंतर तिने त्याला नोकरीहून रिजेक्ट केलं आणि एक वाईट मेला केला. ज्यात तिने त्याला सांगितलं की, तू एक बेकार उमेदवार आहे आणि तुझा सीव्ही सुद्धा बेकार आहे.
तरूणीने केलेल्या या आयडियाचं अनेक महिलांनी कौतुक केलं. एकीने लिहिलं की, हे ऐकून कायला तिच्यासाठी हिरो झाली. तर एकीने लिहिलं की, तू क्वीन आहेस. एका महिलेने लिहिलं की, सूड घेण्याची ही जिद्द पाहून ती कायलावर फिदा झाली. तर काही लोक म्हणाले की, तिने जे केलं ते कमीच केलं. तिने अजून काहीतरी करून त्याचा अपमान करायला हवा होता. तर बऱ्याच लोकांना कायलाची ही आयडिया आवडली नाही. ते म्हणाले की, हे असं करणं बालिशपणा होता.