आईचा जोक ऐकून 5 वर्षाने कोमातून बाहेर आली मुलगी, डॉक्टरही झाले अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:28 PM2024-02-07T13:28:58+5:302024-02-07T13:30:06+5:30
गेल्या पाच वर्षापासून कोमात असलेली मुलगी आपल्या आईचा एक जोक ऐकून जागी झाली.
आईचा आवाज थेट मुलाच्या हृदयाला प्रभावित करतो. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. आई अशी व्यक्ती असते जी मुलांना आतून ओळखते आणि मुलंही आपल्या आईच्या सगळ्या संकेतांना ओळखतात. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे गेल्या पाच वर्षापासून कोमात असलेली मुलगी आपल्या आईचा एक जोक ऐकून जागी झाली. इतकंच नाही तर तिने हसत हसत डोळे उघडले. हे बघून डॉक्टरही अवाक् झाले.
मिशिगनमध्ये राहणारी महिला जेनिफिर फ्लेवेलेन 5 वर्षाआधी एका रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण ती कोमात गेली होती. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर तिला शुद्धीवर आणू शकले नाहीत. यानंतर 5 वर्षाने जेनिफरचे डोळे 25 ऑगस्ट 2022 ला उघडले. झालं असं की, जेनिफरच्या आईने तिच्या बेडजवळ उभी राहून एक झोक ऐकवला. अचानक जेनिफरने डोळे उघडले आणि बेडवर उठून बसली.
न्यूज मॅगझिन पीपल (People) ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरची आई पॅगी मींसने या घटनेबाबत सांगितलं की, जेव्हा जेनिफर उठली तेव्हा ती घाबरली. कारण ती हसत होती आणि असं तिने कधीच केलं नव्हतं.
पॅगी मींस म्हणाली की, जेनिफर जागी तर झाली, पण पूर्णपणे शुद्धीवर नव्हती. तिला बोलता येत नव्हतं. ती फक्त तिचं डोकं हलवत होती. सुरूवातीला ती फार झोपत होती. नंतर ती जास्त जागू लागली.
जेनिफर बोलण्यासाठी आणि आपली शारीरिक हालचाल पुन्हा परत आणण्यासाठी हालचाल करत होती. डॉक्टरांची एक टिमही तिला यात मदत करत आहे.
डॉ. राल्फ वांग सांगतात की, ही घटना फारच दुर्मिळ आहे. अशाप्रकारे कोमातून फार कमी लोक बाहेर येतात आणि जर कुणी यातून बाहेर आले तर त्यांच्या शरीरात फार काही विकास नसतो. पण जेनिफरची केस वेगळी आहे. ती तिच्या मुलासोबत फुटबॉलची मॅच बघण्यासाठीही गेली होती. हा एक चमत्कार आहे.