एका सेल्फीमुळे सापडली १७ वर्षांआधी हॉस्पिटलमधून पळवून नेलेली लहान बहीण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:33 PM2019-11-02T12:33:37+5:302019-11-02T12:53:52+5:30
आजच्या युगात तरूणांसाठी सेल्फीची क्रेझ बघायला मिळते, तर काही लोक याकडे श्राप म्हणून बघतात. कारण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आजच्या युगात तरूणांसाठी सेल्फीची क्रेझ बघायला मिळते, तर काही लोक याकडे श्राप म्हणून बघतात. कारण या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सेल्फीला विरोध होत होता. पण याच सेल्फीमुळे दक्षिण आफ्रिकेतील लहानपणी हरवलेली दोन बहिणी पुन्हा भेटू शकल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन शहरात राहणाऱ्या दोन बहिणी १७ वर्षांआधी हॉस्पिटमधून वेगळ्या झाल्या होत्या. हॉस्पिटलमधील Lavona Solomon या महिलेने जन्माच्या तीन दिवसानंतर मुलीला पळवले होते. पण एका सेल्फीमुळे या दोन बहिणी आश्चर्यकारकरित्या एकत्र आल्या आहेत.
केपटाउनमध्ये राहणाऱ्या सेलेस्टेला दुसरी मुलगी मिशे झाली, तेव्हा तिची पहिली मुलगी कॅसिडी ही तीन वर्षांची होती. जन्माच्या तीन दिवसांनंतर हॉस्पिटलमधून एका महिलेने सेलेस्टेलाची मुलगी पळवली होती. ज्यामुळे मिशे ही तिची मोठी बहीण कॅसिडीपासून वेगळी झाली.
२० वर्षीय कॅसिडी ज्वानस्काव हायस्कूलमध्ये अंतिम वर्षाला होती. तेव्हाच तिथे मिशेने प्रवेश घेतला. दोघींचा स्कूलमध्ये अनेकदा आमनासामना होत होता. त्यांच्या मैत्रिणी म्हणत होत्या की, तीन वर्षांचं अंतर असूनही तुम्ही दोघी एकसारख्या दिसतात. तसेच दोघी जेव्हाही भेटायच्या तेव्हा त्यांनाही असं जाणवायचं की, त्यांच्यात काहीतरी नातं आहे.
एक दिवस कॅसिडीने मिशेसोबत सेल्फी काढला आणि आपल्या मित्रांना दाखवला. त्यानंतर हा सेल्फी कॅसिडीने तिच्या आई-वडिलांना दाखवला. हा सेल्फी पाहून कॅसिडीचे आई-वडील आश्चर्यचकित झाले. त्यांनी शंका व्यक्त केली की, मिशे त्यांची बालपणी पळवून नेलेली मुलगी आहे. तेव्हा कॅसिडीला कळालं की, बालपणी तिच्या एका बहिणीला पळवण्यात आलं होतं.
कॅसिडीने मिशेला विचारलं की, तुझी जन्मतारीख ३० एप्रिल १९९७ आहे का? यावर मिशेने 'हो' असं उत्तर दिलं. ज्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. मिशेची डीएनए टेस्ट करण्यात आली. तिचा डीएनए कॅसिडीच्या परिवाराशी मॅच झाला. त्यानंतर पोलिसांनी Lavona अटक केली. मिशेला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की, तिच्या आईने तिला बालपणी पळवून आणलं होतं. मिशेच्या आईने तिचं पालन-पोषण फारच लाडाने केलं होतं. त्यामुळे मिशेला फारच धक्का बसला.
कोर्टात हेच सांगण्यात आलं की, लोनोवाने मिशेला पळवलं कारण तिचा गर्भपात झाला होता. तिला बाळ हवं होतं. कोर्टाने आता या महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दुसरकीडे मिशे हे ठरवू शकत नव्हती की, तिने तिच्या जन्मदात्या आईकडे जावं की, आधीच्याच घरी रहावं. Lavona ला आणखी तीन मुलं आहेत, जे आता शासनाच्या कस्टडीत आहेत. अखेर मिशे तिच्या खऱ्या आईकडे गेली.