झोपेत पती करतो 'हे' विचित्र काम, महिलेने सांगितलं - '१० वर्षांपासून ती करतेय सगळं सहन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:56 PM2022-01-06T14:56:27+5:302022-01-06T14:57:15+5:30
महिलेने एका पॅरेंटिंग फोरमला सांगितलं की, कशाप्रकारे तिचा पती स्लीप डिसॉर्डरमुळे झोपेत विचित्र वागतो आणि तिचा सेक्स डॉलप्रमाणे वापर करतो. महिलेने सांगितलं की, गेल्या १० वर्षांपासून ती हे सगळं काही सहन करत आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
जगात असे काही विचित्र आजार आहेत ज्याबाबत वाचल्यावर चकित व्हायला होतं. एखाद्या एखादा विचित्र आजार असेल तर घरातील लोक वैतागतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक ब्रिटीश महिला सेक्सेमेनियाने पीडित तिच्या पतीच्या वागण्याला वैतागली आहे. महिलेने तिचं दु:खं आता जगासमोर मांडलं आहे. तिने एका पॅरेंटिंग फोरमला सांगितलं की, कशाप्रकारे तिचा पती स्लीप डिसॉर्डरमुळे झोपेत विचित्र वागतो आणि तिचा सेक्स डॉलप्रमाणे वापर करतो. महिलेने सांगितलं की, गेल्या १० वर्षांपासून ती हे सगळं काही सहन करत आहे.
'रोज नाही, पण कधी कधी असं होतं'
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, महिलेने पॅरेंटिंग फोरम Babycentre ला सांगितलं की, झोपेत पतीच्या वागण्यामुळे ती वैतागली आहे. पण तो हे असं काही प्रत्येक रात्री करत नाही, मात्र, अनेकदा त्याचा हात माझ्या शरीरावर असतो. जेव्हा मी जागी होते तेव्हा मी त्याला जोरात धक्का देते. मग त्याची झोपमोड होते आणि सगळं काही थांबतं. महिलेचा पती सेक्सोमेनियाने पीडित आहे.
काय असतो हा आजार?
सेक्सोमेनिया एक असा स्पीपिंग डिसॉर्डर किंवा पॅरासोमनियाचं रूप आहे, ज्यात व्यक्तीला झोपेत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. स्लीपिंग डिसॉर्डरने ग्रस्त पतीच्या वागण्याबाबत सांगत महिला म्हणाली की, 'झोपेतून जागी झाल्यावर अनेकदा मी स्वत:ला आक्षेपार्ह स्थितीत बघते. हे माझ्यासाठी मानिसक आघातासारखं आहे. मी माझ्या पार्टनरला १० वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. पण हे सगळं झाल्यावर मला माझा वापर झाल्यासारखं आणि असुरक्षित वाटतं. आपलं दु:खं शब्दात सांगणं माझ्यासाठी कठीण आहे'.
त्याला सगळं लक्षात राहतं का?
महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर पॅरेंटिंग फोरमचे यूजर तिला वेगवेगळे सल्ले देत आहेत. एका यूजने महिलेला रात्री रूममधून बाहेर जाण्याचा सल्ला देत सांगितलं की, यावेळी तिला स्वत:ला वाचण्याची गरज आहे. तर एका महिलेने विचारलं की, 'तिच्या पतीला हे सगळं लक्षात राहतं का? माझ्या पतीला सेक्सोमेनियाचे झटके येत होते, पण त्याला काहीच लक्षात राहत नव्हतं. हे माझ्यासाठी भयानक होतं. मला यात दुष्कर्मासारखं वाटत होतं'. यावर उत्तर देत पीडित महिलेने लिहिलं की, 'नाही, त्याला काहीच लक्षात राहत नाही. हा दुर्व्यवहार तेव्हा जास्त होतो जेव्हा तो झोपेत पुन्हा पुन्हा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मी नकार देते'.