बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:35 PM2021-06-05T15:35:55+5:302021-06-05T15:38:03+5:30

महिलेच्या एका पतीने तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना पाहिल्यावर या हा भांडाफोड झाला. आता तर पीडित नवरदेवांची लाइन लागली आहे. 

Woman scammed 19 people in the name of marriage in China | बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड

बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड

googlenewsNext

भारतातील अनेक 'लुटेऱ्या दुल्हन'चे कारनामे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. पण सध्या चीनमधील एका 'लुटेऱ्या दुल्हन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. या महिलेने आतापर्यंत १९ लोकांची लग्नावरून फसवणूक केली आणि त्यांच्याकडून कोट्यावधी रूपये लाटले. पोलिसांनी पीडित पुरूषांच्या तक्रारीवरून महिलेला अटक केली आहे. महिलेच्या एका पतीने तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना पाहिल्यावर या हा भांडाफोड झाला. आता तर पीडित नवरदेवांची लाइन लागली आहे. 

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ही घटना बयानूर शहरातील आहे. इथे राहणारा ३५ वर्षीय व्यक्ती एक व्हिडीओ बघत होता ज्यात त्याला त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना दिसली. यानंतर या व्यक्तीने आपल्या परिवाराला सोबत घेऊन  दुसऱ्या नवरदेवाचा शोध घेतला. तेव्हा या महिलेचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. महिलेने दोन्ही पुरूषांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक केली होती. (हे पण वाचा : एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली...)

पोलिसांनुसार, आरोपी महिला गांसु प्रांतातील आहे. या दोन्ही पीडित पुरूषांची भेट महिलेसोबत एका मॅचमेकर द्वारे झाली होती. महिला लग्न झाल्यावर काहीना काही कारण सांगत घरातून पळून जात होती. आणि दुसऱ्यांना आपली शिकार करत होती.  (हे पण वाचा : दुसऱ्या मुलीसोबत लग्न होता सैनिक प्रियकर, 'बॅंड-बाजा-बारात' घेऊन त्याच्या घरी पोहोचली प्रेयसी!)

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने पहिल्या व्यक्तीला १ लाख ४८ हजार युआन आणि दुसऱ्या व्यक्तीला १ लाख ३० हजार युआनचा चूना लावला. अशाप्रकारे या महिलेने तब्बल १९ पुरूषांची फसवणूक करून त्यांच्याकडून २ मिलियन युआन(२.२८ कोटी रूपये) वसूल केले. 

फरार असलेल्या या महिलेला नुकतीच तिच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला लग्नाच्या दोन महिन्यात आपल्या पतीच्या घरी केवळ १० दिवसांसाठी थांबली होती. ती नेहमीच आपल्या पालकांकडे किंवा मित्रांकडे जात असल्याचं कारण सांगत गायब होत होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, या महिलेचे शिकार जास्त ग्रामीण भागातील लोक आहे. त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे ते सहजपणे या महिलेचे शिकार झाले.
 

Web Title: Woman scammed 19 people in the name of marriage in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.