Hidden room : पै पै जमवून महिलेनं अखेर स्वतःचं घर घेतलं; अचानक पायऱ्या बाजूला सरकवताच दिसलं असं काही.....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:30 PM2021-05-10T15:30:21+5:302021-05-10T15:31:23+5:30
Hidden room inside staircase : जेव्हा महिलेने आपला दरवाजा उघडला तेव्हा तळघरात अंधार होता. तसेच, आतल्या भिंती ओलसर वाटत होत्या.
घर खरेदी करणं प्रत्येकाचे स्वप्न असतं. अनेक वर्षांच्या बचतीनंतर लोक स्वप्नातील घरे खरेदी करतात. परंतु हे घर एखाद्या भयानक स्वप्नासारखे बनले तर काय होईल? अशीच एक घटना समोर आली आहे. @ abi_mia14 नावाच्या सोशल मीडिया युजरनं हा व्हिड़ीओ शेअर केला आहे. @ abi_mia14 नावाच्या सोशल मीडिया युजरसह असेच काहीसे घडले.
वर्षानुवर्षे बचत करून या महिलेने आपले घर विकत घेतले. पण त्यानंतर, त्या महिलेस हे समजले की तिच्या नवीन घराच्या पायऱ्यांखाली दुसर्या घरात जाण्याचा मार्ग लपलेला आहे. त्या महिलेला जेव्हा हे कळलं तेव्हा लगेचच तिनं व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
महिला नवीन घरात आपले सामान लावत होती. अचानक एक दिवस तिने सफाई करताना पायर्यावर ठेवलेला कारपेट काढून टाकला. यानंतर, तिचं लक्ष पायऱ्यांखाली असलेल्या दाराकडे गेले. त्या महिलेने असा दावा केला आहे की कोणीतरी नक्कीच त्याच्या आत राहते. जेव्हा महिलेने आपला दरवाजा उघडला तेव्हा तळघरात अंधार होता. तसेच, आतल्या भिंती ओलसर वाटत होत्या.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
पायर्याच्या आत जाताना महिलेने व्हिडीओ शूट केला. आत भिंतींवर जुनी पेंटिंग्ज होत्या. तसेच बर्याच जुन्या वस्तू, कार्पेट्स माळ्यावर पडल्या होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेचजण घाबरून गेले. एकाने या महिलेला ताबडतोब घर सोडण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी आणखी एकाने लिहिले की, 'जर तो त्या घरात असता तर पळून गेला असता. सर्वात भयावह बाब म्हणजे तळघराच्या भिंतींवर पंज्याची चिन्हे होती.''
बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
एबीच्या घराच्या या भागाचे रहस्य अद्याप समोर आले नाही. तथापि, अनेकांचा असा विश्वास आहे की द्वितीय विश्वयुद्धात सैन्याने लपण्यासाठी याचा उपयोग केला असावा. तथापि, बर्याच लोकांनी भूतांशीही याचा संबंध लावला. या महिलेला अनेकांनी अभिनंदन म्हणत ही जागा स्वच्छ करून खेळण्यासाठी वापरता येईल. असा सल्ला दिला आहे.