महिला तिच्यासाठी शोधतीये जोडीदार, शोधणाऱ्याला ती देणार 4 लाख रूपये; काय आहेत अटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:37 AM2023-07-14T10:37:56+5:302023-07-14T10:40:12+5:30

Partner For Lady: जे कुणी तिच्यासाठी जोडीदार शोधतील त्यांना ती चार लाख रूपये बक्षीस म्हणून देणार. इतकंच नाही तर महिलेने तिच्या जोडीदारासाठी काही अटीही ठेवल्या आहेत.

Woman searching husband offers four lakh rupees to anyone who find good groom to her | महिला तिच्यासाठी शोधतीये जोडीदार, शोधणाऱ्याला ती देणार 4 लाख रूपये; काय आहेत अटी?

महिला तिच्यासाठी शोधतीये जोडीदार, शोधणाऱ्याला ती देणार 4 लाख रूपये; काय आहेत अटी?

googlenewsNext

Partner For Lady:  लोक आपल्यासाठी जोडीदार शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. अनेकदा तर मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणांवर अशा लोकांसोबत भेट होते जे त्यांच्या जीवनाचा भाग बनतात. पण 34 वर्षीय एका महिलेने अशी घोषणा केली आहे की, ती तिच्यासाठी जोडीदार शोधून शोधून थकली आहे. जे कुणी तिच्यासाठी जोडीदार शोधतील त्यांना ती चार लाख रूपये बक्षीस म्हणून देणार. इतकंच नाही तर महिलेने तिच्या जोडीदारासाठी काही अटीही ठेवल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचं नाव ईव टिल्ले कॉल्सन आहे. ती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाची राहणारी आहे आणि एका लॉ फर्ममध्ये काम करते. खास बाब ही आहे की, ती एक सोशल मीडिया स्टारही आहे. या महिलेच्या टिकटॉकचे फॉलोवर्सही खूप आहेत.

दरम्यान या महिलेने तिच्या परिवारातील लोकांना, नातेवाईकांना आणि ऑफिसमधील बॉसलाही हे सांगितलं आहे की, ती तिच्यासाठी जोडीदार शोधू शकत नाहीये. अशात जो कुणी तिला हवा तसा जोडीदार शोधून देईल त्याना ती 5 हजार डॉलर म्हणजे 4 लाख रूपये देईल. इतकंच नाही तर ही ऑफर तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरही शेअर केली आहे.

काय आहे तिच्या अटी?

या महिलेने तिच्या जोडीदारासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. ती म्हणाली की, त्याचं वय 27 ते 40 दरम्यानचं असावं. त्याला खेळ आवडले पाहिजे आणि तो एक चांगला कम्यूनिकेटर असावा. त्यांची उंची कमीत कमी सहा फूट असावी. त्याला कोणत्याही नशेची सवय नसावी. मला याने काहीच फरक पडत नाही की, तो काय करतो. त्याची राजकीय किंवा धार्मिक मतं काय आहेत. त्याला फिरायला आवडलं पाहिजे. आता सध्या लोक तिला वेगवेगळे पर्याय देत आहेत. 

Web Title: Woman searching husband offers four lakh rupees to anyone who find good groom to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.