कशासाठी?...पोटासाठी; मुलांना दोन घास भरवण्यासाठी आईनं केलं मुंडन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:52 PM2020-01-13T12:52:57+5:302020-01-13T12:56:48+5:30
त्यांच्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे.
तामिळनाडूतील सलेम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सलेममध्ये एका आईला आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी तिच्यावर स्वतःचे मुंडन करण्याची वेळ आली. प्रेमा असे या तीन मुलांच्या आईचे नाव असून तिला आपले केस विकून अवघे 150 रुपये मिळाले आहेत. प्रेमा यांचे पती सेल्वन यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्यामुळे सात महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. सेल्वन हे वीटभट्टी कामगार होते. सेल्वन यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्ज घेतले होते. त्यांच्यावर 2 लाख रुपयांचे कर्ज होते.
प्रेमा या सध्या वीटभट्टीत काम करतात. त्यांच्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते, संपले होते. त्यामुळे प्रेमा यांनी शेजारी आणि नातेवाईकांकडे मदत मागितली. मात्र, त्यांना कोणतीही मदत केली नाही. यावेळी एका व्यक्तीने प्रेमा यांना सांगितले की, तुमचे केस कापून द्या, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील. ही व्यक्ती प्रेमा यांच्या केसापासून टोपी तयार करणार होती. त्यानंतर प्रेमा यांनी आपले केस कापून त्या व्यक्तीला 150 रुपयांना विकले. या पैशातून प्रेमा यांनी आपल्या तीन मुलांना जेवण दिले.
दरम्यान, कर्जाच्या बोज्यामुळे प्रेमा या आपल्या पतिप्रमाणे आत्महत्या करण्याचा विचार करत होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली. ज्यावेळी ही घटना ग्राफिक डिझायनर असलेले जी. बाला यांना समजली. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रेमा आणि तिच्या मुलांची मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून मदत मिळत आहेत. आतापर्यंत प्रेमा आणि तिच्या मुलांसाठी एक लाख 45 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने प्रेमा यांना विधवा पेन्शन देण्यास मंजुरी दिली आहे.
(५०० गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळवून देतेय 'ही' महिला)
(वारकऱ्याला लागली पन्नास लाखांची लॉटरी; 'तो' भाग्यवान विजेता कोण?)
(अजब तुझे सरकार; आईने मुलांना आगीतून वाचवलं, पोलिसांनी तिलाच तुरुंगात टाकलं!)