पतीच्या शरीरावरील तिळांना पेनाने सर्कल करून पाठवलं दवाखान्यात, घरी येऊन शर्ट काढलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:09 PM2021-12-15T15:09:09+5:302021-12-15T15:11:13+5:30

एका महिलेने तिच्या पतीच्या शरीरावर दिसत असलेल्या तिळांना पेनाने सर्कल करून पतीला चेकअपसाठी डॉक्टरकडे पाठवलं. पती जेव्हा घरी परत आला तेव्हा डॉक्टरने दिलेला रिस्पॉन्सही हैराण करणारा निघाला.

A woman sent her husband to the doctor after circling around concerning moles on his body | पतीच्या शरीरावरील तिळांना पेनाने सर्कल करून पाठवलं दवाखान्यात, घरी येऊन शर्ट काढलं तर...

पतीच्या शरीरावरील तिळांना पेनाने सर्कल करून पाठवलं दवाखान्यात, घरी येऊन शर्ट काढलं तर...

googlenewsNext

आजाराचे संकेत दिसल्यावर डॉक्टरकडून चेकअप करून घेणं गरजेचं असतं. पण अनेकदा लोक या प्रक्रियेला रोमांचक बनवतात. अमेरिकेत (America) एका महिलेने तिच्या पतीच्या शरीरावर दिसत असलेल्या तिळांना पेनाने सर्कल करून पतीला चेकअपसाठी डॉक्टरकडे पाठवलं. पती जेव्हा घरी परत आला तेव्हा डॉक्टरने दिलेला रिस्पॉन्सही हैराण करणारा निघाला.

डर्मटोलॉजिस्टने महिलेच्या पतीच्या आजारासंबंधी नोट्स कागदावर लिहिण्याऐवजी सर्कल केलेल्या तिळांच्या ठीक बाजूलाच लिहिले. जेणेकरून सहजपणे समजावं की, कोणता तीळ सामान्य आहे आणि कोणत्या तिळावर उपचार करण्याची गरज आहे. चेकअपच्या या अनोख्या प्रक्रियेबाबत पत्नी ब्रिनली माइल्सने टिकटॉकवर शेअर केलं आहे. व्हिडीओवर हजारो लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. लोक पार्टनरची इतकी काळजी घेण्याबाबत ब्रिनलीचं कौतुक करत आहेत.

या घटनेनंतर अनेक स्कीन स्पेशालिस्टने सांगितलं की, अनेक महिला त्यांच्या पतीच्या शरीरावर असे सर्कल करून त्यांच्या क्लीनिकमध्ये  पाठवतात. पतीच्या शरीरावरील साधारण डझनभर तिळांना केलेलं सर्कल दाखवत ब्रिनली म्हणाली की, 'मी अशाप्रकारे माझ्या पतीला डर्मटोलॉजिस्टकडे पाठवलं होतं. माझ्या पार्टनर घरी आल्यावर शर्ट काढलं तेव्हा डॉक्टरने प्रत्येक तिळासमोर त्याच्या कंडीशनबाबत एक नोट लिहिली होती'.

ब्रिनली म्हणाली की, 'डर्मटोलॉजिस्टने सर्कल केलेल्या जास्तीत जास्त तिळांसमोर 'गुड' लिहिलं होतं. पण काही तीळ असेही होते ज्यांचं चेकअप करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला'.

बायोप्सी एक छोटीशी सर्जिकल प्रक्रिया असते. ज्यात कॅन्सरचे संकेत समजण्यासाठी टिशूच्या एका भागाची टेस्ट केली जाते. जेव्हा शरीरावरील तिळात असामान्य बदल होऊ लागतात किंवा त्यांचा रंग बदलू लागतो  तेव्हा बायोप्सीने स्कीन कॅन्सरची टेस्ट केली जाते. पतीच्या शरीरावर असामान्य बदलांना इतक्या बारकाईने बघणाऱ्या या महिलेच्या नजरेचं लोक फारच कौतुक करत आहेत.
 

Web Title: A woman sent her husband to the doctor after circling around concerning moles on his body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.