पतीच्या निधनानंतर ती तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली, गिनीज रेकॉर्ड करत दिला अनोखा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 05:59 PM2022-04-05T17:59:47+5:302022-04-05T17:59:57+5:30

अँजेला टॉर्टोरिस या महिलेने २०१३ मध्ये अँजेलाने १२९ मॅरेथॉनमध्ये (Marathon) सहभाग घेतला. एका वर्षात सर्वाधिक मॅरेथॉन धावणारी महिला म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. ही महिला आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास सगळ्या राज्यात किमान ५ वेळा मॅरेथॉन धावली आहे.

woman sets a record after husband's death run 42 thousand kilometers | पतीच्या निधनानंतर ती तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली, गिनीज रेकॉर्ड करत दिला अनोखा संदेश

पतीच्या निधनानंतर ती तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली, गिनीज रेकॉर्ड करत दिला अनोखा संदेश

Next

आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं गंभीर आजाराने निधन झालं तर आपण खचून जातो. पण काही लोक यातून बाहेर पडतात. इतकंच नाही तर इतरांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करतात. असंच अमेरिकेतील एका महिलेने केलं. अँजेला टॉर्टोरिस (Angela Tortoris) या महिलेच्या पतीचं गंभीर आजाराने निधन झालं. त्यानंतर अँजेला टॉर्टोरिसने आपल्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. तब्बल ४२ हजार किलोमीटर धावली. यातून तिने आरोग्याबाबत जनजागृतीही केली. तिच्या कृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद केली गेली. अँजेला टॉर्टोरिस या महिलेने २०१३ मध्ये अँजेलाने १२९ मॅरेथॉनमध्ये (Marathon) सहभाग घेतला. एका वर्षात सर्वाधिक मॅरेथॉन धावणारी महिला म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. ही महिला आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास सगळ्या राज्यात किमान ५ वेळा मॅरेथॉन धावली आहे.

या रेकॉर्डविषयी अँजेला म्हणते
” मी सध्या केवळ धावते आहे. माझ्या सुटीच्या दिवशीही मी हेच काम करते. माझ्या पतीच्या निधनानंतर मी याबाबत जागरुक झाले आणि आता इतरांना याविषयी मी जागृत करत आहे” अँजेला म्हणाली आहे.

पतीला होता गंभीर आजार
अँजेला टॉर्टोरिसच्या पतीला मल्टीपल स्क्लेरोसिस हा आजार झाला होता. तेव्हापासून ती आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला लागली. तिला आपल्या या आजाराबद्दल लोकांना जागरुक करायचं होतं. त्यामुळे तिने मॅरेथॉन धावण्यास सुरुवात केली. सोबतच तिला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं होते. मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंवर परिणाम करणारा आजार आहे, ज्यामुळे स्नायूंच्या हालचाली, संतुलन आणि दृष्टी यांमध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे तिने धावायला सुरूवात केली.

Web Title: woman sets a record after husband's death run 42 thousand kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.