"तुझं लग्न झालंय कळल्यावर माझं हृदय तुटलं पण तरी..."; इलेक्ट्रिशियनने महिलेसाठी लिहिली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:00 AM2023-08-10T11:00:04+5:302023-08-10T11:07:57+5:30
एक इलेक्ट्रिशियन जेव्हा तिच्या पतीच्या फर्निचरच्या दुकानात आला तेव्हा नेमकं काय घडलं ते मॅकियनने टिकटॉकवर सांगितलं आहे.
अमेरिकेच्या Maceon McCracken सोबत एक अजब घटना घडली आहे. एक इलेक्ट्रिशियन जेव्हा तिच्या पतीच्या फर्निचरच्या दुकानात आला तेव्हा नेमकं काय घडलं ते मॅकियनने टिकटॉकवर सांगितलं आहे. मॅकियनने सांगितले की, तिचे पती कोलटल आणि सासरे डेव बाहेर होते आणि ती त्यांच्या फर्निचरच्या दुकानात काही काम करत असताना, पंखा दुरुस्त करण्यासाठी कॉल केलेला इलेक्ट्रिशियन आला.
मॅकियनने म्हणाली की, पंखा ठीक करण्यासाठी मी त्याखाली असलेला सोफा हलवू लागले. मग मी त्याला येण्यास सांगितलं आणि इतर वस्तू हलविण्यासाठी मला मदत करण्यास सांगितलं. त्याने यावर विचित्र उत्तर दिलं. आता तुमचा आदेश आहे, मग तो पाळावाच लागेल असं म्हणाला. तिने इलेक्ट्रिशियनच्या या विचित्र कमेंटकडे दुर्लक्ष केलं आणि ऑफिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
इलेक्ट्रिशियनने दुकानातील बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली. तो असेही म्हणाला- "तू खूप सुंदर आहेस आणि तुझं लग्न झालं आहे हे जाणून माझं हृदय तुटलं. पण तरीही तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला कळव. मी तुझ्यासाठी सोफ्याच्या कुशनवर एक चिठ्ठी चिकटवली आहे." या सर्व प्रकाराने मॅकियन अस्वस्थ झाली आणि इलेक्ट्रिशियन निघण्याची वाट पाहू लागी. तो निघून गेल्यावर मॅकियनने कुशनवरची चिठ्ठी वाचली.
"मला तुला कोणत्याही अडचणीत टाकायचे नाही पण तू खूप सुंदर आहेस. तुझं लग्न झालं असले तरी तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला आनंद होईल" असं त्याने चिठ्ठीत म्हटलं होतं. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या मॅकियनने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियनला इशारा केला आणि इलेक्ट्रिशियननेही माफी मागितली. हीच गोष्ट सोशल मीडियावर आली तेव्हा लोकांनी त्यावर भरभरून कमेंट करायला सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.