तिला वाटलं होतं ती कधी आई होऊ शकणार नाही, गर्भवती गायीने दूर केली समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 12:43 PM2019-02-26T12:43:13+5:302019-02-26T12:44:34+5:30

ब्रिटेनच्या वेल्समध्ये राहणारी एका महिलेने चार वर्षांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता. लॉरी नावाच्या महिलेसाठी आई होणं एखादं स्वप्न साकार झाल्यासारखं होतं.

Woman solved miscarriage problem after watching pregnant cows gave birth to so | तिला वाटलं होतं ती कधी आई होऊ शकणार नाही, गर्भवती गायीने दूर केली समस्या!

तिला वाटलं होतं ती कधी आई होऊ शकणार नाही, गर्भवती गायीने दूर केली समस्या!

Next

ब्रिटेनच्या वेल्समध्ये राहणारी एका महिलेने चार वर्षांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता. लॉरी नावाच्या महिलेसाठी आई होणं एखादं स्वप्न साकार झाल्यासारखं होतं. कारण आधी ४ वेळा तिचं मिसकॅरेज झालं होतं. सर्वांनाच वाटत होतं की, ती आता आई होऊ शकणार नाही. पण नंतर एका गर्भवती गायीला पाहून लॉरीची समस्या दूर झाली. त्यानंतर कोणत्याही अडचणीशिवाय तिने २०१५ मध्ये एका बाळाला जन्म दिला. 

लॉरी नावाची ही महिला कॉन्वी टाऊनमध्ये राहते. ती पहिल्यांदा २११ मध्ये गर्भवती झाली होती. त्यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला होता. पण त्यानंतर गर्भवती होणे आणि झाली तर ती सांभाळणे तिला त्रासदायक होऊ लागले होते. लॉरी सांगते की, जेव्हा तिने पुन्हा बाळासाठी प्रयत्न केले तेव्हा तिला कमजोरी वाटू लागली होती. नेहमी आजारी पडत होती. कोणतेही उपचार फायदेशीर होत नव्हते. ४ वेळा मिसकॅरेज झालं होतं. एकदा तर जुळे बाळ होणार होते. अशाप्रकारे तिने ५ बाळांना गमावलं. त्यानंतर आता मी आई होऊ शकणार नाही, असंच तिला वाटायचं.

नंतर एका रात्री लॉरी घरी टीव्ही बघत बसली होती. स्क्रीनवर वेल्स फार्मिंग प्रोग्राम सुरू होता. यात गायींच्या डिलेव्हरीबाबत सांगितलं जात होतं. कार्यक्रमादरम्यांन लॉरीला कळालं की, गायीच्या वासरासाठी आयोडीन आणि थयोरॉक्सिन महत्त्वाचं असतं. हे कमी असेल तर गायींना अनेक समस्या होतात. 

लॉरी सांगते की, टीव्ही कार्यक्रमात सांगितलेली या गोष्टीने तिला विचार करायला भाग पाडलं. तिला वाटलं की, आता पुन्हा मेडिकल हेल्प आणि टेस्टची गरज आहे. त्यानुसार तिने पुन्हा रिसर्च सुरू केलं. ती घरी आयोडिन जास्त असलेलं मीठ घेऊन आली. थायरॉइडच्या स्पेशालिस्टला ती भेटली. हे सगळं तिच्यासाठी फायद्याचं ठरू लागलं होतं. त्यानंतर लॉरीने २०१५ मध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला. 

लॉरीचे डॉक्टर सांगतात की, चान्स घेणं हे त्यांच्या पेशंटसाठी कठीण काम नव्हतं. पण बाळाला कोणत्याही अडचणीशिवाय ९ महिने पोटात ठेवणं आव्हान होतं. लॉरी सांगते की, 'मी हे थामपणे सांगू शकते की, जर मी तो प्रोग्राम पाहिला नसता तर आज माझं दुसरं बाळ नसतं. देवाला माहीत मला आणखी किती मिसकरेज बघावे लागले असते'.

Web Title: Woman solved miscarriage problem after watching pregnant cows gave birth to so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.