अरेरे! महिलेने पार्लरमध्ये तब्बल 40 हजार देऊन केस कापले अन् आरशात पाहून रडू कोसळले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:06 PM2022-04-07T13:06:36+5:302022-04-07T13:33:10+5:30

लीनाने टिकटॉकवर तिच्या केसांच्या ट्रिटमेंटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

woman spends 40 thousand rupees on worst haircut ever | अरेरे! महिलेने पार्लरमध्ये तब्बल 40 हजार देऊन केस कापले अन् आरशात पाहून रडू कोसळले, कारण...

अरेरे! महिलेने पार्लरमध्ये तब्बल 40 हजार देऊन केस कापले अन् आरशात पाहून रडू कोसळले, कारण...

Next

मुली आणि महिलांना सुंदर दिसण्याची खूप इच्छा असते. यासाठी ती काहीही करायला तयार आहे. मग ते घरगुती उपचार असोत किंवा महागडे सौंदर्य उपचार. सुंदर दिसण्यासाठी महिला काहीही आणि कितीही पैसा खर्च करण्यास तयार असतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एका तरुणीला खूप दिवसांपासून तिचे काळे केस गोल्डन ब्राऊन करायचे होते. यासाठी महिलेने बराच काळ पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. पण चाळीस हजार खर्च करून शेवटी तिच्या केसांची अवस्था पाहून तिला रडू कोसळले.

लीनाने टिकटॉकवर तिच्या केसांच्या ट्रिटमेंटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. लीना ही न्यूयॉर्कमध्ये राहणारी विद्यार्थिनी आहे. केसांच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तिने बर्याच काळापासून बचत करण्यास सुरुवात केली. तिला तिचे नैसर्गिक गडद केस ब्लॉन्ड बनवायचे होते. यासाठी तिने घराजवळील एका सलूनमध्ये जाऊन केस कापून कलरिंग करून घेतले. शेवटी मिळालेला रिझल्ट पाहून लीना ढसाढसा रडू लागली. 

लीनाच्या म्हणण्यानुसार तिला ब्लॉन्ड लूक हवा होता. मात्र चाळीस हजारांची सेव्हिंग खर्च केल्यानंतर तिचे केस लाल झाले. तिला हा रंग अजिबात नको होता. एवढ्या मेहनतीने वाचवलेले पैसे वाया जात असल्याचे पाहून लीनाच्या डोळ्यातून अश्रू आले. लीनाने आपले दु:ख ज्या व्हिडिओमध्ये शेअर केले त्या व्हिडिओच्या सुरुवातीला लीनाचे केस काळे होते. यानंतर तिने सलून उपचाराचा भाग आणि शेवटी रिझल्ट दिला आहे. पण व्हिडिओच्या शेवटी ती जोरजोरात रडताना दिसली.

लीनाचा हा व्हिडीओ आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लीनाने काही दिवसांपूर्वी व्हिडीओ अपलोड केला होता. मात्र, अनेकांनी रडणाऱ्या लीनाला ती सुंदर दिसत असल्याचे सांगून सांत्वन केले. एकाने लिहिले की तिचे केस काळे असल्याने ते सोनेरी बनवण्याआधी तिला लाल केले जाते. दोन ते तीन सेटिंगनंतर तिचे केस ब्लॉन्ड होतील. यात रडण्यासारखे काही नाही. केसांच्या ट्रिटमेंटची ही योग्य प्रक्रिया आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman spends 40 thousand rupees on worst haircut ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.