बोंबला! महिलेने जिवंतपणीच करून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार, ७५ हजार रूपये केला खर्च; कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:37 PM2021-05-13T15:37:38+5:302021-05-13T15:43:35+5:30
एका रिपोर्टनुसार, या महिलेने स्वत:च्या फेक अंत्यसंस्कारासाठी ७१० पाउंड म्हणजे जवळपास ७५ हजार रूपये खर्च केला.
कधी ना कधी कुणाच्याही डोक्यात एकदा नाही तर अनेकदा हा विचार येतोच की, जग किती अजब आहे. असा विचार मनात येतो कारण आपल्या आजूबाजूला अशा विचित्र घटना घडत असतात. अशा घटना ज्यांवर विश्वास बसत नाही. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चिलीमध्ये एका महिलेने स्वत:चा खोटा अंत्यसंस्कार करून घेतला.
एका रिपोर्टनुसार, या महिलेने स्वत:च्या फेक अंत्यसंस्कारासाठी ७१० पाउंड म्हणजे जवळपास ७५ हजार रूपये खर्च केला. ५९ वर्षीय मायरा अलोंजो सॅटियागो शहरात राहते. तिच्या डोक्यात हा विचार आला कारण गेल्या काही दिवसांपासून ती कोरोनामुळे होत असलेले अंत्यसंस्कार बघत होती. त्यांबाबत विचार करत होती. त्यानंतर तिने तिच्या अंत्यसंस्काराची रिहर्सल करण्याचा विचार केला. यासाठी तिने तिच्या जवळच्या लोकांनाही तयार केलं. (हे पण वाचा : लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....)
मायरा यादरम्यान बॉक्समध्ये काही तासांसाठी झोपून राहिली. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या मित्र परिवाराने आणि नातेवाईकांनी खोटे अश्रूही काढले आणि अनेक लोकांनी यावेळी फोटोही काढले. हा नजारा तसाच होता जसा एखाद्या अंत्यसंस्कारावेळी असतो. यावेळी तिने पांढरा ड्रेस घातला होता आणि तिच्या नाकात रूई सुद्धा टाकण्यात आला होता. त्यासोबतच त्या सर्व गोष्टी केल्या ज्या अशावेळी केल्या जातात.
मायराने याबाबत सांगितले की, आता मृत्यूनंतर तिला अंत्यसंस्काराची गरज नाही कारण तिने जिवंत असताना तिचा अंत्यसंस्कार पाहिलाय. मायरा म्हणाली की, कोरोनामुळे होत असलेले मृत्यू पाहून तिने हा निर्णय घेतला होता. काही लोकांनी मायराच्या या कृत्यावर टीका केली. लोक म्हणाले की हे एकप्रकारे जीव गमावत असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्यासारखं आहे. जे अजिबात योग्य नाही.