तरूणीने सावत्र भावासोबत केलं डेटींग, बिनधास्तपणे म्हणाली - त्याच्यावर प्रेम होतं....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:38 PM2021-05-15T16:38:58+5:302021-05-15T16:41:49+5:30
मॅडी म्हणाली की, ती कॅलमला बालपणापासून ओळखते. त्याच्या वडिलाने माझ्या आईसोबत साखरपुडा केला होता. पण त्यांचं नातं संपलं होतं.
कुणी आपल्या सावत्र भावासोबत डेटींग करू शकतं का? सहजपणे याचं उत्तर नाही असं कुणीही देईल. पण एका मॅडी नावाच्या महिलेने सावत्र भावासोबत डेटींग सुरू केलं आणि म्हणाली की त्याच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम करते. सीक्रेट क्रश नावाच्या एका डेटींग शोमध्ये मॅडीने स्वत: हा खुलासा केला. या शोमध्ये लोक डेटवर जाण्याआधी व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करतात. मॅडी म्हणाली की, ती कॅलमला बालपणापासून ओळखते. त्याच्या वडिलाने माझ्या आईसोबत साखरपुडा केला होता. पण त्यांचं नातं संपलं होतं.
सावत्र भावासोबत डेटींग
मॅडी म्हणाली की, मी इथे माझ्या भावाला हे सांगण्यासाठी आले की, मी त्याला पसंत करते. मी आई आणि त्याचे वडील काही वर्षापूर्वी सोबत होते. आता ते सोबत नाहीत. कॅलम माझ्या आईच्या प्रियकराचा मुलगा आहे. म्हणजे तो माझा एक्स सावत्र भाऊ आहे. मॅडी आणि कॅलम त्यांचे आई-वडील वेगळे झाल्यापासून एकमेकांना भेटले नाही. ते सोशल मीडियातून संपर्कात आहेत. (हे पण वाचा : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)
त्याच्यावर प्रेम होतं...
मॅडी जी अजूनही आपल्या आईसोबत राहते. ती म्हणाली की, कॅलमला का सांगायचं आहे. याबाबत ती फार घाबरलेली होती. पण उत्साहीतही फार होती. कॅलमला मॅडीच्या मनात त्याच्याविषयी असलेल्या भावना सजल्यावर तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की, त्याला विश्वास बसत नाहीये की, ही तू आहे.
मॅडी म्हणाली, तिला वाटलं की, कॅलम मॅच्युअर झाला आहे. ती म्हणाली की, मला नाही वाटत आम्ही काही बेकायदेशीर करतोय. यावर कॅलम म्हणाला की, मुळात आम्ही सावत्र भाऊ-बहिणही नव्हतो. कारण त्यांच्या आई-वडिलांनी लग्नच केलं नव्हतं. ते फक्त सोबत होते. (हे पण वाचा : भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली)
मॅडीने कॅलमला विचारले की, यावर त्याच्या वडिलांची काय प्रतक्रिया असेल. तर तो म्हणाला की कदाचित त्याच्या वडिलांकडे लगेच बोलायला काहीच नसेल. मला नाही माहीत ते यावर कशी प्रतिक्रिया देतील. पण तुला माहीत आहे मी फार विचार करत नाही. हा विषय माझा आहे त्यांचा नाही.