8 मुलं झाल्यावर पतीच्या दुसऱ्या लग्नाचा झाला भांडाफोड, पत्नीने असा शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:26 AM2024-01-24T10:26:26+5:302024-01-24T10:26:51+5:30
दोघांच्याही लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली आहेत.
एका 33 वर्षीय महिलेला तेव्हा धक्का बसला जेव्हा तिला समजलं की, तिच्या पतीची आणखी एक पत्नी आहे. महिलेला 8 मुलं आहेत. तिच्या पतीचं वय 61 वर्षाचा आहे. तिने आता नुकसान भरपाई म्हणून 200 मिलियन युआन म्हणजे साधारण 200 कोटी रूपये मागितले आहेत. या घटनेची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. दोघांच्याही लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली आहेत. महिला म्हणाली की, ती श्रीमंत परिवारातील होती. ती 23 वर्षाची असताना या व्यक्तीला ऑनलाईन भेटली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू झालं.
ती म्हणाली की, 'त्याने स्वत:ला सिंगल असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आमचं नातं सुरू झालं'. एका व्हिडिओत महिलेने सर्टिफिकेट दाखवत सांगितलं की, तिचं लग्न 2015 मध्ये झालं होतं. दोघांनी 10 मुलांना जन्म देण्याचा विचार केला.
महिलेला तिचा पती म्हणाला की, यातील एक तरी मुल यशस्वी होईल. नंतर महिलेने व्हिडिओत सांगितलं की, मुलांचा जन्म अमेरिकेत सरोगेट मदरच्या माध्यमातून झाला.
यासाठी 10 मिलियन युआन म्हणजे 11 कोटी रूपये खर्च झाले. पण गेल्यावर्षी महिलेला तेव्हा धक्का बसला जेव्हा तिला समजलं की, ज्या व्यक्तीला ती तिचा पती म्हणते त्यानेच तिच्यावर केस दाखल केली. त्याने दिलेले सगळे पैसे आणि संपत्ती परत मागितली.
महिलेला दुसरा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला समजलं की, तिच्या पतीची आणखी एक पत्नी आहे. तो परदेशात रहायला गेला होता. महिलेने आता पती आणि त्याच्या परिवारावर केस दाखल करून 28 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे महिन्याला 23 लाख रूपये देण्याची मागणी केली आहे.
ती म्हणाली की, हे पैसे तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आहेत. महिलेच्या केसवर तिच्या सासरच्या लोकांनी सांगितलं की, ते स्वत: मुलांचा सांभाळ करण्यास तयार आहेत. जर तिने ऐकलं नाही तर कायद्याची मदत घेऊ.
आता महिला म्हणते की, ती तिच्या मुलांना कुणालाही देऊ शकत नाही. यानंतर तिने मेंटनेन्स म्हणून 200 कोटी रूपयांची मागणी केली आहे. या प्रकरणावर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुनावणी सुरू झाली होती. केस अजूनही सुरू आहे.