महिला टीचरने 15 वर्षीय विद्यार्थ्याचं केलं लैंगिक शोषण, सगळ्यांसमोर आले पाठवलेले मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:37 PM2024-01-18T12:37:35+5:302024-01-18T12:37:58+5:30
मुलांसोबत महिला शिक्षिका ज्याप्रमाणे फोनवर बोलत होती ते वाचून सगळ्यांना धक्का बसला. खासकरून मुलांचे आई-वडील टेंशनमध्ये आहेत.
परदेशातील शिक्षक महिलांचे अनेक कारनामे नेहमीच समोर येत असतात. एका महिला शिक्षिकेला नोकरीहून काढण्यात आलं होतं. आता तिच्या फोन असे मेसेज सापडले जे फार हैराण करणारे आहेत. मुलांसोबत महिला शिक्षिका ज्याप्रमाणे फोनवर बोलत होती ते वाचून सगळ्यांना धक्का बसला. खासकरून मुलांचे आई-वडील टेंशनमध्ये आहेत.
38 वर्षीय या महिलेचं नाव कॅंडिस बार्बर आहे. तिला एका 15 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. यासाठी तिला 2021 मध्ये सहा वर्ष आणि दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता तिचे फोनमधील मेसेज समोर आले आहेत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ती मुलांना धमकी देऊन किंवा चलाखीने आपल्या जाळ्यात फसवत होती. त्यांनी शिकवण्याच्या बहाण्याने त्यांचं शोषण करत होती. महिला तीन मुलांची आई आहे. ती आताही स्वत:ला निर्दोष मानते.
तिने पॅनलला पाठवलेल्या एका नोटमध्ये लिहिलं की, दोषी ठरवण्यात आल्यावरही मी हेच म्हणाले की, मी निर्दोष आहे. या महिलेबाबत सांगायचं तर ती ब्रिटनच्या प्रिंन्सेस रिसबोरो स्कूलमध्ये शिकवत होती. इथे तिची नजर स्पोर्ट्स डे दिवशी असणाऱ्या एका मुलावर पडली. तेव्हापासून तिने मुलाला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवण्यास सुरूवात केली.
मुलाने सांगितलं की, त्याचं लैंगिक शोषण 11 ऑक्टोबर 2018 मध्ये झालं होतं. यानंतर ती मुलाला फेल करण्याची धमकी देत होती. बार्बरला दोन केसेसमध्ये शिक्षा झाली. तिल 2020 मध्ये पहिल्या मुलाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात दोषी ठरवण्यात आलं.
नंतर मार्च 2021 मध्ये 16 वर्षाने लहान मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात दोषी आढळली. कोर्टात सांगण्यात आलं की, केस सुनावणी दरम्यान कोर्टात सांगण्यात आलं की, ती मुलांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना धमकी देत होती. यामुळे मुलाच्या वागण्यात बदल आला. तो शांत राहत होता आणि स्वत:ला रूममध्ये बंद करून घेत होता.