दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:07 PM2019-10-30T13:07:08+5:302019-10-30T13:11:45+5:30
जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही.
(Image Credit : videohive.net)(फोटो सांकेतिक)
जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही. दु:खात दोन वर्षे निघून जाता आणि अचानक पुन्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येते. पण ती व्यक्ती तुम्हाला भेटतही नाही आणि ओळखतही नाही. काय कराल तुम्ही?
पबमध्ये शेफ होता 'तो'
मेट्रो यूकेच्या एका वृत्तानुसार, एका तरूणीसोबत असंच झालं. तिला २ वर्षांआधी तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डच्या निधनाची बातमी कळाली होती. पण तिने त्याला पुन्हा पाहिले तेही जिवंत. ही घटना घडली ती रेचल सोबत. ऑस्ट्रेलियातील रेचल २ वर्षांआधी १८ वर्षांची होती. ती पबमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरूणाला डेट करत होती. दोघांचंही चांगलं सुरू होतं.
हात मोडला अन् त्याने पैसे उधार घेतले
साधारण ३ महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर एका दिवस तरूणाने रेचलला संगितले की, त्याची नोकरी गेली. एका अपघातात त्याचा हात मोडला. म्हणजे तो आता पबमध्ये जेवण तयार करू शकणार नाही. त्यामुळे त्याने रेचलकडून ७० हजार रूपये उधार घेतले. त्यातील २५ हजार त्याने नंतर तिला परतही केले. पण एक दिवस अचानक त्याने फोन कॉल्स आणि मेसेजेसना रिप्लाय देणं बंद केलं.
काही रिप्लाय करत नव्हता
रेचलने सांगितले की, सगळं काही अचानक झालं. त्याने फोन करणं बंद केलं. मेसेजला रिप्लायही देत नव्हता. हे सगळं फारच विचित्र घडत होतं. तो गायब झाला होता. विचारपूस केल्यावर कुठूनतरी तिला माहिती मिळाली की, तो क्वींसलॅन्डच्या रिहॅब सेंटरमध्ये आहे. असंही कळालं की, त्याने मित्रांकडूनही पैसे उधार घेतले होते.
आईने सांगितले मुलाची हत्या झाली
एक दिवस रेचलला तरूणाच्या मित्राने सांगितले की, तो आता या जगात नाही. या मित्राला त्या तरूणाच्या आईने फोन करून ही माहिती दिली होती. त्याच्या आईने असंही सांगितलं होतं की, एका गॅंगकडून त्याने पैसे घेतले होते, जे तो परत करू शकला नाही. या गॅंगच्या लोकांनी त्याचा हत्या केली.
दोन वर्षांनी तो दिसला
रेचल आतून तुटली होती. हळूहळू रेचलनेही विश्वास ठेवला की, त्यांचा साथ इतक्याच दिवसांचा होता. पण दोन वर्षानंतर रेचलने त्याला दुसऱ्या शहरातील एका रेस्टॉरन्टमध्ये पाहिले आणि तिला धक्का बसला. रेचलने सांगितले की, 'मी माझ्या मित्रांसोबत एका फॅमिली रेस्टॉरन्टमध्ये गेले होते. तो दुसऱ्या रेस्टॉरन्टमध्ये होता. मी त्याला पाहिलं, तो जिवंत होता'.
तरूणाच्या आईचा रेचलला फोन
अर्थातच त्याला पाहिल्यावर रेचलने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तरूणाने तिला भेटण्यास नकार दिला. हॉटेलच्या मॅनेजरने त्या तरूणाचं नावही वेगळं सांगितलं होतं. हे इथंच थांबलं नाही. त्याच रात्री रेचलला त्या तरूणाच्या आईचा फोन आला. ती म्हणाली की, माझ्या मुलाला रेस्टॉरन्टमधून काढलं गेलं. यासाठी रेचल जबाबदार आहे. कारण तिच्यामुळेच रेस्टॉरन्टमध्ये गोंधळ झाला होता'.
तो भेटला पण ओळखण्यास दिला नकार
रेचलने सांगितले की, 'माझ्या हे लक्षात येत नव्हतं की, नेमकं काय होतंय. मला फक्त त्याला एकदा भेटायचं होतं आणि त्याला काही प्रश्न विचारायचे होते. काही दिवसांनी मी त्या परिसरात पुन्हा गेले. यावेळी तो मला भेटला. पण त्याने मला ओळखण्यास नकार दिला'. रेचलनुसार, या घटनेुमुळे ती फारच दुखावली गेली. तरूणाला काही अडचण व्हावी असं तिला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे तिने त्याचं नाव न घेता या घटनेची पोस्ट लिहिली'.