पत्नीने डस्टबीनमध्ये फेकली होती लाखो रूपयांची चेन, समजताच कचरा गाडीच्या मागे धावला पती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:06 PM2022-02-23T19:06:40+5:302022-02-23T19:20:56+5:30
जेव्हा पत्नीने याची माहिती पतीला दिली तेव्हा तो वेड्यासारखा कचऱ्याच्या गाडीमागे धावत गेला. मोठ्या प्रयत्नांनंतर पतीला पत्नीची सोन्याची चेन सापडली.
अनेकदा नकळत आपल्या हातून असं काही घडत असतं ज्याने आपलं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका महिलेच्या बेजाबाबदारपणामुळे तिचं लाखो रूपयांचं नुकसान झालं असतं. महिलेने तिची बहुमूल्य गोल्ड चेन चुकून घरातील डस्टबीनमध्ये फेकली. तिला तिची चूक लक्षात येणार तोपर्यंत डस्टबीनमधील कचरा ट्रकमध्ये लोड होऊन डंपयार्डात गेला होता. जेव्हा पत्नीने याची माहिती पतीला दिली तेव्हा तो वेड्यासारखा कचऱ्याच्या गाडीमागे धावत गेला. मोठ्या प्रयत्नांनंतर पतीला पत्नीची सोन्याची चेन सापडली.
२० फेब्रुवारीला महिलेने या घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट केली. महिलेचं नाव याया आहे. तिने सांगितलं की, कशाप्रकारे चुकून तिने स्वत:चं लाखो रूपयांचं नुकसान करून घेतलं होतं. तिने तिची गोल्ड चेन घरातील डस्टबीनमध्ये फेकली होती. जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती कचऱ्याच्या गाडीजवळ गेली पण तोपर्यंत कचरा ट्रकमध्ये टाकला गेला होता. मग तिने याबाबत पतीला सांगितलं.
पती लगेच ट्रकच्या मागे धावत गेला. इतक्या मोठ्या ट्रकमध्ये महिलेची प्लास्टिकची बॅग शोधणं अवघड काम होतं. पण कचरेवाल्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रकमधील एक एक बॅग उघडून पाहिली. अनेक तासांच्या शोधानंतर ती बॅग सापडली. ज्यात यायाची चेन होती. पतीने लगेच पत्नीला व्हिडीओ कॉल करून याबाबत सांगितलं. तेव्हा तिच्या जीवात जीव आला.
यायाने कचरेवाल्यांचे धन्यवाद मानले. ती म्हणाली की, या लोकांनी त्यांची मदत केली नसती तर इतक्या मोठ्या ट्रकमध्ये चेन शोधणं अशक्य झालं असतं. यायाने चेनचे फोटो फेसबुकवर शेअर केले. या पोस्टनंतर लोकांनीही कचरेवाल्याचं कौतुक केलं.