अचानक काळी झाली महिलेची जीभ अन् उगवले केस, स्थिती पाहून डॉक्टर हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:53 PM2023-05-11T13:53:50+5:302023-05-11T13:55:07+5:30

Woman tongue turns black : 60 वर्षीय महिलेला रेक्टल कॅन्सर झाला होता आणि जपानमध्ये 14 महिन्यांआधी तिच्यावर उपचार सुरू झाले होते.

Woman tongue turns black reaction antibiotics black hairy tongue syndrome | अचानक काळी झाली महिलेची जीभ अन् उगवले केस, स्थिती पाहून डॉक्टर हैराण....

अचानक काळी झाली महिलेची जीभ अन् उगवले केस, स्थिती पाहून डॉक्टर हैराण....

googlenewsNext

Woman tongue turns black : एक फारच धक्कादायक आणि चिंता वाटणारी घटना समोर आली आहे. एका महिलेची जीभ अचानक काळी झाली आणि त्यावर छोटे छोटे केसही आलेत. ही फारच विचित्र घटना असून लोक हैराण झाले आहेत. ब्रिटिश मेडिकल जर्नल केस रिपोर्ट्सनुसार, 60 वर्षीय महिलेला रेक्टल कॅन्सर झाला होता आणि जपानमध्ये 14 महिन्यांआधी तिच्यावर उपचार सुरू झाले होते. तिच्या कीमोथेरपीच्या एडवर्स इफेक्टला कमी करण्यासाठी महिला मायनोसायक्लिन घेत होती, ज्याचा वापर पिंपल्सपासून ते निमोनियापर्यंत सगळ्या उपचारांसाठी केला जातो.

डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितलं की, महिलेला पॅनिटुमुमाब-इंड्यूस्ड त्वचेचा घाव रोखण्यासाठी मिनोसायक्लिन 100 मिलीग्राम दिवसाला दिलं जात होतं. आम्हाला समजलं की, याच्या रिअ‍ॅक्शनमुळे महिलेची जीभ काळी झाली आणि त्यावर केस आलेत. अ‍ॅंटीबायोटिकने महिलेला Black Hairy Tongue चं शिकार केलं आहे. महिलेची जीभ तर काळी झालीच, सोबतच तिची त्वचाही ग्रे झाली.

द मेट्रोच्या वृत्तानुसार, आधी डॉक्टरांना आढळलं की, महिलेचा चेहरा ग्रे झाला. मग जेव्हा महिलेने तोंड उघडून आपली जीभ दाखवली तर ते हैराण झाले. कारण महिलेची जीभ काळी झाली होती आणि त्यावर केसही होते. डॉक्टरांनी सांगितलं की, यानंतर त्यांनी महिलेची औषधं बदलली. आता तिच्या स्थितीत बदल होण्याची आशा आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली होती. इथे एका व्यक्तीला समजलं की, त्याच्या जिभेमध्ये काहीतरी बदल होत आहे. जिभेवर केस आले होते. जीभ काळी होत होती. पण त्याला काही वेदना होत नव्हत्या. ही स्थिती पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. 

याबाबत एक रिपोर्ट JAMA Dermatology जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. डॉक्टरांनी या जिभेचा अभ्यास करून त्याचा रिपोर्ट यात लिहिला होता. डॉक्टरांनी सांगितलं की, ही व्यक्ती ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोमने ग्रस्त आहे. हा आजार फारच त्रासदायक ठरू शकतो. हा आजार अ‍ॅंटी-बायोटिकच्या साइड इफेक्टमुळे होऊ शकतो. किंवा तोंडात घाण असल्याने, तोंड कोरडं असल्याने, धुम्रपान केल्याने किंवा नरम अन्न खाल्ल्याने होऊ शकतो.

Web Title: Woman tongue turns black reaction antibiotics black hairy tongue syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.