बाबो! बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी दुसऱ्या देशातून आली, सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:31 PM2022-02-16T12:31:09+5:302022-02-16T12:38:31+5:30

बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी हजारो किमीचा प्रवास करून आलेला तरुणीला मोठा धक्का बसला आहे. 

woman travels to surprise long distance boyfriend but finds him with another girl sex relationship | बाबो! बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी दुसऱ्या देशातून आली, सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली 

बाबो! बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी दुसऱ्या देशातून आली, सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली 

Next

प्रेमासाठी अनेक लोक वाटेल ते करतात. अनेकांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे सतत ऐकायला मिळतात. लॉन्ग रिलेशनशिपमधले किस्से तर एकदम भन्नाट असतात. एकमेकांपासून दूर असल्याने अनेकदा कपलमध्ये दुरावा निर्माण होतो. तर कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये देखील अनेक ट्विस्ट असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी हजारो किमीचा प्रवास करून आलेला तरुणीला मोठा धक्का बसला आहे. 

अमेरिकेत ही घटना घडली असून सत्य समजताच गर्लफ्रेंडच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आपल्या बॉयफ्रेंडला सुंदर सरप्राईज देण्यासाठी ही तरुणी दूरच्या देशातून प्रवास करून त्याच्यापर्यंत पोहोचली. दोघेही वेगवेगळ्या देशात शिकत आहेत. मेरी फत्ज नावाची ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी अगदी आनंदात इथे आली होती. मात्र इथे येताच तिला भलतंच सत्य समजलं, जे समजल्यावर तिला झटकाच बसला. मेरीने सोशल मीडियावर स्वतः आपल्यासोबत घडलेली ही घटना शेअर केली. 

मेरीचं @maryfatz नावाचं TikTok अकाऊंट आहे आणि तिने व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना दाखवली. मेरी आपल्या बॉयफ्रेंडच्या घराचा दरवाजा ठोकते. मात्र आतून काहीच उत्तर येत नाही. मात्र तिला माहिती होतं की तिचा बॉयफ्रेंड आतमध्येच आहे. मात्र तो दरवाजा उघडत नव्हता कारण आतमध्ये त्याच्यासोबत दुसरीच मुलगी होती. ती बराच वेळ त्याच्या रूमच्या बाहेर उभी राहिली. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, जेव्हा तुम्ही तुमच्या लाँग डिस्टन्स बॉयफ्रेंडला भेटायला जाता आणि तो यामुळे दरवाजा उघडत नाही कारण आतमध्ये दुसरी मुलगी असते.

मेरीने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 28.4 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि सात हजारांहून अधिकांनी यावर कमेंट करत मुलीला सपोर्ट केला आहे. काही लोकांनी आपले असेच अनुभव शेअर केले आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी अनेकदा समोर येतात. एका यूजरने सांगितलं की त्याच्यासोबतही अशीच घटना घडली होती. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून याची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman travels to surprise long distance boyfriend but finds him with another girl sex relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.